मजुरांना मारहाण करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर कार्यवाही करा – शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल यांची मागणी

punish-to-forest-officer-who-is-beat-the-innocent-labour
श्री.नंदकिशोर वैरागडे ,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर 

कोरची,दि.२८/०२/२०२३

कोरची तालुक्यातील ढोली गोठा – नाडेकल  रस्त्यावर रस्ता कामाची गिट्टी टाकून परत येतअसता वेळेस पुराडा येथील वनपरीक्षेत्र अधीकारी दिघोर व त्याच्या  सोबत असलेले वनरक्षक गावडे व वनकर्मचार्यांनी ट्रॅक्टर थांबवून काही चौकशी न  करता बेदम पणे मारहाण केली यात मजूर मयाराम नाकामी हा गंभीर जखमी झाला तसेच ट्रॅक्टर चालक राजेद्र वरखडे यानांही बेदम पणे मारहाण केली. मारहाण करीन असतांना  वनअधीकाऱ्यांच्या सोबत काही बेडगाव येथील मजूर  होते त्यांनी वन कर्मचारी व. वनपरीक्षेत्र अधीकारी दिघोरे यांना विनंती  केली की “यांना आम्ही ओळखतो यांना मारहाण करू नका ” परंतु अधिकारी हे दारू प्यायले होते व ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते, नंतर प्रकरण अंगावर येईल म्हणून ट्रॅक्टर चालकानी आमच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्याचा प्रयत्न केला असा बनाव केला.

या बाबतची  माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल surendrasingh chandel  यांना मिळाली असता दि.२५/०२/२०२३  ला बेडगाव येथे मजुरांची भेट  घेऊन हकिकत जाणून घेतली,  वनपरीक्षा अक्षीकारी दिघोरे , वनरक्षक गावडे व सोबत असलेले वन कर्मचारी यांना या मारहाण प्रकरणी निलंबीत करावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिह चंदेल , लोकेंद्रशहा  सायं,  मुजाहीन शेख ,  डॉ अनील उईके,  नरेश देशमुख,  गुरुदेव मेश्राम यांनी केली आहे .   newsjagar

वनअधीकारी व वन कर्मचारी यांचे वर कार्यवाही करीता शिवसेनेच्या वतीने उया डि.एफ. ओ. वडसा कार्यालयाला घेराव करण्यात येणार आहे.