चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.०८/०३/२०२३
उन्हयाळ्याची चाहुल लागत असुन उन्हाची कायली वाढत असल्याने बाहेर गावावरून शासकीय कार्यालय , बाजार पेठेत खरेदी , शाळेत येणाऱ्या विद्यार्थी , प्रवाशी व कामाकारिता येणाऱ्या नागरिकांसाठी चामोर्शी शहरात प्रथमच महिलांच्या वतीने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन ये – जा करणाऱ्या पांथस्थाची पाण्यासाठी भटकंती होऊ नये व सर्वांना थंड पेयजल मिळावे यासाठी स्वर्गीय सुखदेवराव नैताम बहुउद्देशीय संस्था चामोर्शी च्यावतीने स्वर्गीय सुखदेवराव नैताम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सभापती निशांत नैताम ,नगरसेवक राहुल नैताम यांचे सौजन्याने यमुना वुमेन्स सोशल फाउंडेशन च्या वतीने स्वर्गीय सुखदेवराव नैताम यांच्या पत्नी नीलिमा नैताम यांचे हस्ते या पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी यमुना वुमेन्स सोशल फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमा खोबे, नगरसेविका काजल नैताम, सोनाली पिपरे ,दीपाताई नैताम, वैशाली भांडेकर, अर्चना बारसागडे, नीलिमा वासेकर, पुष्पा कोठारे, चंचल गव्हारे, संध्याताई जुवारे ,कविता बारसागडे, कविता किरमे, आशा बुरांडे, काजल सोमनकर, शुभांगी खोबे ,नंदाताई कोठारे आदी महिला उपस्थित होत्या.newsjagar
यासाठी स्व . सुखदेवराव नैताम बहुउद्देशीय संस्था व मित्र परिवारांनी मोलाचे सहकार्य केले.