नागपूर / चक्रधर मेश्राम दि. ९/३/२०२३
अंबाझरी – नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बुलडोझर लावून पाडल्या प्रकरणी न्यायालयाने अँट्रासिटीचा कलमा अंतर्गत नोटीस बजावले होते. वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते, जबाबदार व जागृत नागरिक विनोद खोब्रागडे यांनी केस दाखल केली होती.
मौजा अंबाझरी- नागपूर येथे स.नंबर.1 हा 350 एकर सरकारी नंबर आहे, त्यामध्ये तलाव होते आणि आताही आहे, तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 20 एकरात स्मारक होते,ते स्मारक बेकायदेशीर पद्धतीने बुलडोझर लावून महसूल अधिकारी यांच्या आशीर्वादाने गरुड कंपनीने पाडले.
अंबाझरी तलाव आजही मोक्यावर असतानां सुद्धा 7/12 वर बगीचा दाखवून शासनाची दिशाभूल केली. ज्या दिवशी जमीन महसूल कलम 150(2)ची नोटीस दिले, त्याच दिवशी फेरफार मंजूर केले,असे महाराष्ट्रात,भारतात कुठेच होत नाही.व तसा कायदा नाही.
अखेर विनोद खोब्रागडे यांनी व्यथीत होऊन, विशेष जिल्हा व सत्र न्यायालय वरोरा येथे अँट्रासिटीचा कलमासह फौजदारी पीटीशन दाखल केली.व स्वतःच आर्गुमेन्ट केले. न्यायमूर्ती यांनी आरोपी गरुड कंपनी, मंत्री, विभागीय आयुक्त नागपूर, जिल्हाधिकारी नागपूर,उपविभागीय अधिकारी नागपूर,तहसीलदार नागपूर,मंडळ अधिकारी नागपूर,तलाठी अंबाझरी,व महानगरपालिका उप आयुक्त नागपूर यांना नोटीस ईशु केले होते . आरोपीना शासन सरकारी वकील कसे काय देऊ शकते .? असा प्रश्न श्री.खोब्रागडे यांनी उपस्थित केला असता त्यांना सरकारी वकील मिळाले नाही, खाजगी वकिल पत्र दाखल करून उतर देन्यास वेळ मागीतला आहे, पुढची पेशी तारीख 13/4/2023 आहे.newsjagar