दोटकुली घाटावरून अवैध रेती वाहतूक, प्रशासनाचा कानाडोळा

illegal-sand-transportaion-from-dotkuli
illegal-sand-transportaion-from-dotkuli

श्री.प्रदीप वाळके ,मुख्य संपादक,न्यूज जागर 

चामोर्शी,दि.१२/०३/२०२३

चामोर्शी तालुक्यातील दोटकुली घाटावर कुठलीही परवानगी नसताना स्टाक करून असलेली रेती ची बिना परवानगी ने  खुलेआम वाहतुक सुरू असल्याचे दिसून येत आहे. तरी प्रशासनाने याकडे कानाडोळा केला असल्याचे नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.  illegal-sand-transportaion-from-dotkuli

दोटकुली नदी घाटातून मोठ्या प्रमाणात आजपर्यंत उत्खनन सुरु असताना आमदार डॉक्टर देवराव होळी MLA DR.DEORAO HOLI  यांनी रात्रोला धाड मारली असता उत्खनन करीत असल्याचे व मोठ्या प्रमाणात गाड्या नदीपात्रात दिसून आल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले होते. परंतु सदर प्रकरणी कुठलीही कारवाई झालेली नाही. या घाटावरून रेतीची वाहतूक सतत आणि मोठ्या प्रमाणात व कुठल्याही अळथळ्याविना चालू आहे त्यामुळे संबंधित विभाग रेती तस्करांना सहकार्य तर करीत नाही ना ?  असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे. साप्ताहिक सुट्टी आणि सणासुदीच्या सुट्टीच्या दिवशी अधिकारी लोक घरी आराम करीत असतांना मात्र रेती तस्करी जोरात सुरु असते ,अगदी गावातूनही जलद गतीने रेती वाहतूक सुरु असतांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, तेव्हा संबंधित विभागाने सुद्धा या रेती वाहतूक करणाऱ्या गाडांच्या स्पीड वर नियंत्रण ठेवण्याकरिता कठोर पावले उचलावी अशी नागरिकांकडून मागणी होत असल्याचे दिसून येते.newsjagar 

जेव्हा जेव्हा पत्रकारांनी तहसीलदारांना प्रतिक्रियेसाठी फोन केला असता त्यांचे एकच म्हणणे असते कि मंडळ अधिकाऱ्यांकडून चौकशी करून कार्यवाही करण्यात येते. पण नेमकी कोणावर आणि कोणती कार्यवाही होते ते मात्र नागरिकांना समजत नाही. 

चामोर्शी पंचायत समितीच्या आमसभेत सुद्धा हा विषय मोठ्या प्रमाणात गाजला होता परंतु कुठलीही कारवाई संबंधित अवैध रेती वाहतूक करणाऱ्यावर होताना दिसत नाही. महसूल प्रशासनाने या घाटावर गस्त लावून अवैध होणाऱ्या रेती वाहतुकीवर आळा घालणार काय ? हा प्रश्न जनतेच्या मनात सतत भेडसावत आहे

रेती उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जनतेकडून केल्या जात आहे.

याबाबत तहसीलदार नागटिडक यांना विचारणा केली असता संबंधित घाटाची कुठलीही परवानगी दिलेली नाही आणि तशी जर वाहतूक होत असेल तर मंडळ अधिकार्‍याकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.