वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

श्री.अरुण बारसागडे , वार्ताहर 

सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा क्षेत्रातील चिकमारा बिटात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली.

नेहमी प्रमाणे चिकमारा येथील गुराखी शेतकरी श्री.रामदास डुकरू नैताम (६५)रा. चिकमारा हे जंगलात गुरेढोरे चरावयास नेला असता सायंकाळी गावात परत न आल्याने गावातील ५०-६०लोकांनी जंगलात शोधाशोध घेतली.परंतु सायंकाळी कोणतीही ठावठिकाणा लागला नाही त्यामुळे सदर घटनेची माहिती सकाळी देताच वनपरिक्षेत्र अधिकारी सालकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक वनपाल बुरांडे तसेच वनरक्षक सोरते यांच्या सह गावकऱ्यांनी जंगलात शोधाशोध केली असता रस्त्याच्या कडेला वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या श्री.रामदास डुकरू नैताम यांचा मृतदेह आढळून आला.

सदर घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी सिंदेवाही येथिल ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले व त्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी वनविभागाच्या वतीने मृतांच्या पत्नी ला २५हजार रूपयांची तात्काळ मदत दिली.

सदर चार महिन्यांत चिकमारा येथील वाघाच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला ठार केले होते हे विशेष.मागिल चार महिन्यांत दुसऱ्यांदा वाघाच्या हल्ल्यात दुसरा बळी गेल्याने या परीसरात भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे सदर वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.