चक्रधर मेश्राम द्वारा
दि. १३ मार्च २०२३
महाराष्ट्रात जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी असतांना मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नका, असं आवाहन केलं. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास काय परिणम पडू शकतात याबाबत भाष्य केले. जुन्या पेन्शन योजनेसाठी 14 लाख कर्मचारी आक्रमक असुन दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची पोटतिडकी नेमकी काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या न्याय्य हक्काच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेने 14 मार्चला संपावर जाणार असल्याची स्पष्ट, कठोर भूमिका घेतली आहे. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नका, असं आवाहन केलं. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर किती भार येईल याबाबद्दल समजविण्याचा प्रयत्न केला. याशिवाय या विषयावर कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यास तयार असून त्यांनी सूचना द्यावी, असं फडणवीस प्रांजळपणे म्हणाले. तर आमदार आणि खासदारांना याना देण्यात येणारे पेंशन बंद करण्यात यावे. तसेच मानधनही बंद करण्यात यावे.अशी सूतोवाच कर्मचाऱ्यांच्या तोंडून निघताना दिसत आहे .newsjagar
“अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली मग महाराष्ट्र सरकार जुनी पेन्शन योजना लागू का करित नाही. अशाप्रकारचे अनेकविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारने हा प्रश्न समजून घेणे महत्त्वाचे आहे. असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.