श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
गडचिरोली,दि.१५/०३/२०२३
उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमकें नारगुंडा हद्दीतील मौजा मर्दहुर गावातील रहिवासी असलेला युवक नामे साईनाथ नरोटी, वय २६ वर्षे याची दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी रात्री २१.०० वा. चे दरम्यान नक्षलवाद्यांनी गोळी झाडून हत्या केली होती. सदर घटनेचा तपास गडचिरोली पोलीस दलाने सुरु केला असता, मृतक साईनाथ नरोटी याच्या हत्येमध्ये जहाल नक्षली नामे प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे वय २७ वर्षे रा. भामरागड तह. भामरागड जि. गडचिरोली याचा सहभाग असल्याची माहीती मिळाली. त्या अनुषंगाने दिनांक १४/०३/२०२३ रोजी मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे मौजा मर्दहूर गावापासुन सुमारे १० किलोमीटर अंतरावरील जंगल परिसरात विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून जहाल नक्षली नामे प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे वय २७ वर्षे रा. मर्दहूर तह. भामरागड जि. गडचिरोली यास अटक केली.newsjagar
गावडे हा माहे मार्च २००० मध्ये पेरमीली दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता, त्यानंतर ६ महीणे कार्यरत राहुन माहे सप्टेंबर २००० मध्ये प्लाटुन दलम उत्तर गड. – गोंदीया डिव्हीजन मध्ये त्याची बदली करण्यात आली. त्यानंतर सन २००७-०८ मध्ये सेक्शन डेप्युटी कमांडर या पदावर कार्यरत राहुन तो सन २००९ ते जुलै २०११ पर्यंत प्लाटुन ए कमांडर या पदावर कार्यरत होता. त्यानंतर जुलै २०११ ते फेब्रुवारी २०१२ पर्यंत देवरी दलममध्ये दलम कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर विविध प्रकाराचे एकुण २२ गुन्हे दाखल असुन त्यामध्ये १० खुन, ८ चकमक, १ दरोडा, २ जाळपोळ व १ इतर यांचा समावेश आहे. त्याचा मृतक साईनाथ नरोटे याच्या हत्येमध्ये सक्रीय सहभाग असल्याची खात्री झाल्याने त्याच्यावर पोस्टे भामरागड येथे अप. क्र. १७/२०२३ अन्वये नोंद करण्यात आला आहे व अन्य दोन संशयीत आरोपींचा शोध व पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे.
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे माहे- जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ६६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.