प्रलय सहारे प्रतिनिधी न्यूज जागर
भेंडाळा ,दि.१९/०३/२०२३
शासनातर्फे गावागावात ग्रामपंचायत च्या माध्यमातून विविध कार्यक्रम राबवित असून नागरिकांच्या सोयी सहित, आरोग्य या प्रश्नाला गांभीर्याने हाताळल्या जाते, पण ग्राम पंचायत भेंडाळा चे मात्र या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. newsjagar
अवकाळी आलेल्या पावसाने मात्र भेंडाळा येथील पंचशील चौकातील नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या पण नाल्या साफ नसल्यामुळे पाऊस ओसरल्यावर नालीतील घाण कचरा हा रस्त्यावर विखुरलेला दिसून येत आहे , अवकाळी पावसाने च हे हाल आहेत तर पावसाळ्यात मात्र यापेक्षाही बिकट परिस्थिती असते, नाल्यांच्या साफसफाईकडे ग्रामपंचायत चे नेहमीच दुर्लक्ष होते असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.
सदर समस्या लक्षात घेता ,नागरिकांच्या आरोग्याची काळजीस्तव ग्रामपंचायत ने त्वरित नाल्या साफ कराव्या अशी नागरिकांची मागणी आहे