न्युज जागर, प्रतिनिधी
बल्लारपुर , दि.१८/०३/२०२३
२० आँगस्ट २०२२ ला बल्लारपुर येथील रहवासी राहुल खोब्रागडे व्यवसाय ड्राइवर यांनी बल्लारपुर ते भुजगाव येथे बुकिंग घेऊन गेला. गाडी मध्ये बसलेले कस्टमर सुद्धा बल्लारपुर कला मंदिर येथील रहीवासी आहेत. राहुल हा ड्राइवर असल्यामुळे, गाडीत बसलेले लोक कोणत्या कामाकरीता जात आहे हे विचारणा केली तेव्हा त्या मुलांनी सांगीतले भुजगांव येथुन आजी कडुन पैसे आणायचे आहे. त्यानंतर राहुल च्या गाडीत बसलेले लोक शेगाव येथे नास्ता करायला थांबले. राहुल आपल्या गाडीतच बसलेला होता. एक तासा नंतर शेगांव च्या बस स्टँन्ड जवळ सिव्हील ड्रेस वर काही लोक आले. राहुल ला वाटले की ते ट्रैफिक पोलीस आहेत म्हणुन त्यांनी गाडीचे सर्व कागदपत्रे दाखविले. तरी सुद्धा गाडी शेगांव पोलीस स्टेशन मध्ये लावण्यात आली. पोलीस स्टेशन मध्ये राहुल ला माहिती झाले की ते पोलीस नसुन वन विभागाचे कर्मचारी आहेत. संपुर्ण गाडी चा तपास घेतला असता गाडीत काहीच मिळाले नाही. तरी सुद्धा चिमुर चे वन परिक्षेत्र अधिकारी नैताम यांनी ड्रायव्हर राहुल खोब्रागडे याचा काही गुन्हा नसतानां देखील राहुल वर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २ (१६) , ९ , ३९, ४४, ५०, ५१, भां. द. वि. ३४ ,१२० बी अन्वये खोट्या गुन्हात फसविण्यात आले. कारण दिनांक २१ आँगस्ट २०२२ रोजी राहुल च्या आई ला वन परिक्षेत्र अधिकारी नैताम चिमुर ने राहुल यास अटक केल्याची माहिती दिली त्यावेळेस नैताम यांनी राहुल च्या घरुन जाणाऱ्यांना दारु चे दोन बम्पर व १,०००००/- (एक लाख) रुपयाची मागणी केली. अशिक्षित लोकांना धमकी दिली की एक लाख रुपये देणार तरच गाडी व मुलाला आरोपी म्हणुन गुन्ह्यात घेत नाही. परंतु राहुल खोब्रागडे च्या घरची परिस्थिति फार हलाक्याची असल्यामुळे, जसे तसे ३०,०००/- जमा केले. एक लाख रक्कम न दिल्यामुळे राहुल ला गुन्ह्यात आरोपी केले आणी गाडी सुद्धा गुन्ह्यात घेतली. अशी माहिती राहुल खोब्रागडे यांनी दिलेल्या निवेदनातुन मिळाली आहे.
चिमुर चे वन परिक्षेत्र अधिकारी यांनी पैश्याच्या व दारुच्या लालचा पोटी एका गरीब ड्रायव्हर चा गुन्हा नसतानां सुद्धा फसविले आहे. वन विभागाचे अधिकाऱ्यांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ५२ नुसार उप वन संरक्षक यांना सुपुर्दनाम्यावर सोडण्याचा अधिकार असुन सुद्धा सुपुर्द नाम्यावर गाडी न सोडता गोरगरीबांना न्यायालयाच्या चकरा मारायला भाग पाडत आहेत.newsjagar
दिनांक १३ मार्च २०२३ रोजी ला राहुल चे निवेदन प्राप्त होताच ब्रम्हपुरी चे ACF धोंडणे साहेब यांची भेट घेतली तेव्हा ते बोलले की राहुल नावाच्या ड्रायव्हर चा काहीच गुन्हा नव्हता, ACF यांनी नैताम यांना वारंवार फोन केला की ड्रायव्हर वर गुन्हा दाखल करु नको आणी गाडी सुद्धा गुन्ह्यात घेऊ नका तरी सुद्धा नैताम नी दारुच्या नशेत गुन्हा दाखल केला. ऐवढेच नाही तर वन परिक्षेत्र अधिकारी नैताम यांनी अधिकाऱ्यांना दारुच्या नशेत अपशब्द बोलल्याचे सांगीतले. जेव्हा अधिकाऱ्यांना माहिती आहे की तो दारुच्या नशेत राहतो आणी चुकीचे काम करुन गोरगरीबांवर अन्याय करतो अशा बेजवाबदार अधिकाऱ्याला निलंबित करायला पाहिजे. DFO मल्होत्रा साहेब हे सुद्धा बोलले की नैताम हा नेहमीच आँन ड्युटी दारु पिऊन राहत असल्यामुळे त्याचा कडुन अधिकार हिसकावुन नैताम च्या ठीकाणी दुसऱ्या अधिकाऱ्यांना बसविण्यात आले. २० आँगस्ट २०२२ नंतरच नैताम वर कारवाई करण्यात आली.
वन विभागाचे कर्मचारी अधिकाऱ्यांनी एक गरीब मुलाचे भविष्य खराब केलेले दिसुन येत आहे. वन विभागाचे वन मंत्री सुधिरभाऊ मुनंगटिवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील गोरगरीब जनतेवर अन्याय होत आहे. सरकारी कर्मचारी दारु पिऊन कर्तव्यात कसुर करतात काय सुधिरभाऊ मुनंगटिवार हे अशा अधिकाऱ्यावर दखल घेतील काय ?? लवकरच वन मंत्री कडे तक्रार दाखल करण्यात येणार तसेच आदर्श मीडिया एसोसीएशन लवकरच वन विभागाचा असली चेहरा समोर आणुन देणार आहे. ब्रम्हपुरी क्षेत्राचा भोंगळ कारभार शासनाच्या समोर लवकरच येणार आहे असे प्रियाताई झांबरे यांनी न्युज जागर च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगीतले.