अंगावर वीज कोसळल्याने विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

श्री.अमित साखरे, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर

चामोर्शी,दि.१८/०३/२०२३

शाळेतून घरी जाताना सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अंगावर वीज कोसळल्याने नवव्या वर्गातील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्विटी सोमनकर(१६ रा.मालेरचक) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.newsjagar

मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारपिट, अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असता चामोर्शी तालुक्यातील मालेर चक गावातील स्विटी सोमनकर ही नववीतील विद्यार्थिनी शाळेतून घरी परतताना वाटेतच तिच्या अंगावर वीज कोसळली. आसपासच्या लोकांना लक्षात येताच त्यांनी तिला सुरवातीला जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्रकृती अत्यंत खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपरचादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. स्विटीच्या मृत्यूने गावात आणि शाळेत हळहळ व्यक्त होत आहे. student dead by lightening