देसाईगंज तालुक्यातील काँग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद

श्री. भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर 

देसाईगंज,२१/०३/२०२३

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेची नुकतीच बैठक दी. 20 मार्च ला गजानन महाराज मंदिर सभागृह येथे पार पडली असता येथूनच शुभारंभ करण्यात आला असून सद्या देसाईगंज तालुक्यातील सावंगी, गांधीनगर, नवीन लाडज या गावांतून दिनांक 21 मार्च रोजी तालुका काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस कमिटी तर्फे लोकांच्या भेटी घेत, त्यांच्या समस्या जाणून घेत, यावेळी नफरत छोडो, भारत जोडो, च्या घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली. या अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला. काँग्रेसला साथ देऊन देशाला अंधाराच्या गर्तेतून प्रकाशवाटेवर घेऊन जाऊया आणि पुन्हा एकदा ‘स्वर्णीम भारत’ घडवू, असे लिहिलेले पत्र लोकांना वितरित करण्यात आले.NEWS JAGAR 

यावेळी हाथ से हाथ जोडो अभियानात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम, तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष संजय करंनकर, दत्तात्रय लेनगुरे , जगदीश शेंद्रे , नानाजी कुथे , युवक काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, जिल्हा परिषद आमगाव – विसोरा गटाचे निरीक्षक टिकाराम साहारे, नरेंद्र गजपुरे सेवादलाचे तालुका अध्यक्ष दुषांत वाटगुरे, शहरध्यक्ष भिमराव नगराळे, विमल मेश्राम, चैतनदास चंदनबटवे, मनोहर खेकारे, चंडीकार, ओमु ठाकारे, देवचंद बनकर, युवराज वाघाडे युवक काँग्रेस कार्यकर्ते, लोकेश शेंडे, आदी तालुका काँग्रेस व युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.