श्री.विलास ढोरे ,वडसा तालुका प्रतिनिधी, न्युज जागर
कुरूड २२/०३/२०२३
कुरुड गावात अभियानाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद
काँग्रेस नेते सन्माननीय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनंतर अखिल भारतीय काँग्रेसने सुरू केलेल्या हात से हात जोडो मोहिम नुकतीच दिनांक २२मार्च ला देसाईगंज तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून नावलौकिक असलेल्या कुरुड गावामध्ये हात से हात जोडो चा शुभारंभ आणि संपूर्ण गावात घरोघरी चौका चौकात लोकांच्या भेटी घेत या अभियानाच महत्व कुरुड येथील नागरिकांना पटवून सांगण्यात आले.
यावेळी नफरत छोडो भारत जोडो च्या घोषणा देत संपूर्ण गावात रॅली काढण्यात आली या अभियानात मोठ्या संख्येने नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतला. काँग्रेसला साथ देऊन देशाला अंधाराच्या गर्दीतून प्रकाश वाटेवर घेऊन जाऊया आणि पुन्हा एकदा स्वर्णीम भारत घडवू असे लिहिलेले परिपत्रक लोकांना वितरित करण्यात आले.
यावेळी हात से हात जोडो अभियानात ओबीसी विभागाचे जिल्हा सचिव मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, नितीन राऊत तालुका उपाध्यक्ष, संजय करांकर उपसरपंच विसोरा,पंकज चाहंदे युवक तालुका अध्यक्ष भीमराव नगराडे माजी नगरसेवक नगरपरिषद देसाईगंज, सुरेशजी मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, मनोहरजी निमजे तालुका महासचिव, विजय कुंभालवर, जगदीश शेंद्रे, ज्येष्ठ नेते नामदेव मिसार,युवा नेते अमर भरे, अशोक कुथे, सोमेश्वर दिवठे, भाऊराव चौधरी, माणिक बेद्रे, लक्ष्मीकांत शिलार, ज्ञानेश्वर ठाकरे, डाकराम भुरे, एकनाथ बुराडे, प्रभाकर ठाकरे, गणेश भोयर, रवींद्र कांबळी, गणपत बेदरे, दिनेश टेंभुर्ण गावातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या अभियानात सहभाग घेतला