देसाईगंजचे नवे पोलीस निरिक्षक किरण रासकर तर आरमोरीचे संदीप मंडलिक

श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्युज जागर

देसाईगंज,दि.२२/०३/२०२३

तक्रारींचा गठ्ठा वाढल्याने दोन पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

आरमोरी तसेच देसाईगंज येथील दोन पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तक्रारीचा गठ्ठा वाढत गेल्याने या बदल्या करण्यात आल्याची चर्चा आहे.newsjagar 
देसाईगंजचे पोलीस निरिक्षक महेश मेश्राम यांना गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात जमा करण्यात आले आहे. आरमोरीचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांना किटाळी येथील कमांडो प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख करण्यात आले आहे, तर किटाळी प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख संदीप मंडलिक यांना आरमोरीचे ठाणेदार बनविण्यात आले आहे.