श्री.भुवन भोंदे प्रतिनिधी,न्युज जागर
देसाईगंज,दि.२४.०३.२०२३/ २१.३७ वा.
चक्काजाम आंदोलन करून शिंदे-फडणविस सरकारचा केला जाहिर निषेध
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाना २४ तास मोफत वीज पुरवठा करण्याची मागणी करणाऱ्या तत्कालीन विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणविस व तत्कालीन स्थितीत चक्काजाम आंदोलन करून शासकीय कर्मचाऱ्यांना वेठीस धरणाऱ्या स्थानिक आमदारांना आपणच दिलेल्या शब्दाचा विसर पडल्याने या विरोधात देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात एमएसईबी कार्यालयावर धडक देऊन चक्काजाम आंदोलन केला. दरम्यान शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या शिंदे-फडणविस सरकारचा जाहिर निषेध करत तब्बल एक तास वाहतूक अडवून धरल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प पडल्याने वाहनांची रांगच्या रांग लागली होती.
गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहित जिल्हा असुन जिल्ह्यात विजेचा अत्यल्प वापर आहे.अशात उपलब्ध सिंचन सुविधेच्या भरोशावर येथील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई भरून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात रब्बी धान, भाजीपाला,मक्याची लागवड केली.माञ आठ तास वीज पुरवठा करण्यात येत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना जबर फटका बसु लागला असता येथील शेतकऱ्यांनी १३ मार्च रोजी देसाईगंज येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता घनश्याम सारवे यांच्या मार्फतीने उर्जा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन पाठवून २४ तास वीज पुरवठा करा,अन्यथा विरोधात शंकरपुर विद्युत कार्यालयाला घेराव व जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला असता १६ मार्च पासुन १२ तास वीज पुरवठा करण्याचा शासन परिपञक काढुन अंमलबजावणी सुरू करण्यात आली.NEWSJAGAR
दरम्यान सुरू करण्यात आलेला वीजपुरवठा खंडित रित्या पुरवठा करण्यात येत असुन वारंवार लोडशेडिंग करण्यात येत असल्याने कमी दाबाच्या विजेमुळे अनेकांच्या कृषी पंपाच्या मोटारी जळणे सुरु झाले तर चार ये सहा तासच वीजपुरवठा करून खंडित पणे वीजपुरवठा करण्यात येत असल्याने जमिनीतील पाणी जमिनीतच मुरत असल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
असे असताना देखील महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठ्याचा वर्षभराचा बिल देऊन शेतकऱ्यांनी सदर बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला आहे.यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी दाद मागायची कुठे?असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तथापी लगतच्या तेलंगणा राज्याच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही २४ तास मोफत वीज व पाणी पुरवठा करण्यात यावा.वीजबील मीटर रिडींग नुसारच देण्यात यावे. वीज कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करण्यात यावे.घरगुती वीजबील कमी करण्यात यावे.बंद पडलेले मीटर तत्काळ बदलून देण्यात यावे,आदी मागण्यांना घेऊन येथील शेतकऱ्यांनी छगन शेडमाके यांच्या नेतृत्वात देसाईगंज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर घेराव आंदोलन करून चक्काजाम आंदोलन केले असुन मागण्यांचे निवेदन उपकार्यकारी अभियंता सारवे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.
आंदोलनात देसाईगंज तालुक्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी नंदु नरोटे,मनोहर निमजे,पिंकु बावणे, लिलाधर भर्रे,विलास बन्सोड,मनोज ढोरे,विलास ढोरे,अभय बुद्धे,सदानंद दोनाडकर,गोपाल दिघोरे, जयमाला पेंदाम,समिता नंदेश्वर,पदमा कोडापे,पुष्पा कोहपरे,महेश भरणे,जगदीश शेंद्रे,जग्गी परसवाणी, आनंदराव वाढई आदी शेतकरी,विविध पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनुचित घटना घडु नये यास्तव चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.