श्री. अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्युज जागर
नागभीड,दि.२४.०३.२०२३/६.११ वा
“जिल्ह्यात ४५० सामूहिक वनहक्क ग्रामसभा पैकी फक्त नागभिड मधील 10 ग्रामसभा ची रोजगार हमी पोर्टलवर नोंदणी”
महाराष्ट्र शासनाने 30 नोव्हेंबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करून सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना रोजगार हमी योजने अंतर्गत कामे करण्यासाठी अंमलबजावणी यंत्रणा मान्यतेची घोषणा केली. मात्र या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त नागभिड तालुक्यातील ग्रामसभा कोरंबी, कसरला, सावर्ला , हुमा, खडकी, मांगरुड, खरबी, सारंगड, धामणगाव चक व वासाला मक्ता या ग्रामसभांनी रोजगार हमी योजनेच्या पोर्टलवर ग्रामसभेची नोंदणी करावी यासाठी जिल्हा व विभागीय आयुक्तांकडे कडे प्रस्ताव पाठवले होते. मात्र बरेच प्रयत्नानंतर विभागीय सह आयुक्त नागपूर यांचे स्तरावरून दि. २८ फेब्रुवारी 2023 रोजी १० ग्रामसभांची पोर्टलवर नोंदणी झाली आहे. “जिल्ह्यात ४५० सामूहिक वनहक्क ग्रामसभा पैकी फक्त नागभिड मधील 10 ग्रामसभा ची रोजगार हमी पोर्टलवर नोंदणी झाली.आता रोजगार हमी योजने अंतर्गत अमलबजावणी यंत्रणा म्हनून तालुक्यातील 10 ग्रामसभा स्वतंत्रपणे कार्य करणार आहे. सदर ग्रामसभानी नियोजन कामांची चिन्हांकित यादी पंचायत समितीच्या मार्फत जी. प. चंद्रपूर कडे नियोजन आराखडा स्वरूपात पाठविला त्यास मंजुरी प्राप्त झाल्यानंतर सदर ग्रामसभा स्वतंत्रपणे रोजगार हमी अंतर्गत कामे करणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार प्राप्त होईल, वनहक्क क्षेत्रात वृक्षारोपण, मृदा जल संधारणसाठी बांधबंदिस्ती, रोपवन नर्सरी, तलावांचे खोलीकरण, गौनवन उपाजाचे साठवणी साठी गोडाऊन व प्रक्रिया इत्यादी बरीच कामे ग्रामसभा स्वतंत्रपणे करणार आहे. यासाठी ग्रामसभांना शासन निर्णयानुसार गाव स्तरावर ग्राम मेट/रोजगार सेवक, बेअर फुट टेक्निशियन यांची निवड केली आहे.
ग्रामसभेची नावाची नोंद शासनाचे रोजगार हमी योजना पोर्टलवर झाल्याबद्दल गावातील लोकामधे आनंद व उत्साहाचे वातावरण गावात पाहायला मिळते आहे.