चामोर्शी येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅली

श्री.अमित साखरे,गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

चामोर्शी,दि.२४.०३.२०२३/ ०५.०५ वा 

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चामोर्शी व ग्रामीण रुग्णालय चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने जा. कृ. बोमनवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. National Tuberculosis Eradication Program

या जनजागृती रॅलीला उद्घाटक म्हणून डॉ लीला मदने वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, अध्यक्ष म्हणून डॉ प्रफुल हुलके तालुका आरोग्य अधिकारी चामोर्शी व प्रमुख पाहुणे म्हणून हितेंद्र चांदेकर प्राचार्य जा कृ बोमनवार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, डॉ शिल्पा गभने वैद्यकीय अधिकारी,मोहन भुरसे तालुका आरोग्य पर्यवेक्षक, पुरुषोत्तम घ्यार आर के एस के समुपदेशक,नागेश मादेशी आय सी टी सी समुपदेशक ,मिताली रामटेके तालुका आशा समन्वयक, राजेंद्र अल्लीवार एन सी डी समुपदेशक उत्तम सुरणार कुष्ठरोग तंत्रज्ञ,गोविंदा कडस्कर लसीकरण सनियंत्रण, वितराज कुणघाडकर मलेरिया पर्यवेक्षक इ.उपस्थित होते.NEWSJAGAR

रॅलीच्या सुरुवातीला उपस्थित विद्यार्थ्यांना क्षयरोग पर्यवेक्षिका स्नेहा गायकवाड यांनी जागतिक क्षयरोग दिनाचे महत्व,लक्षणे जसे दोन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला,छातीत दुखणे, भूक मंदावणे,वजनात लक्षणीय घट, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, अशक्तपणा जाणवणे माणेवरील गाठी, तपासणी, निदान, 6 महिने उपचार कालावधी, घ्यावयाची काळजी, निक्षय पोषण आहार योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवर डॉ लीला मदने, डॉ प्रफुल हुलके, प्राचार्य चांदेकर यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. ही रॅली शहरातील हत्ती गेट,बाजार लाईन चवडेश्वरी मंदिर, नगरपंचायत आठवडी बाजार मार्गे क्षयरोगाबाबत घोषवाक्य व माहिती पत्रके वाटप करून बोमनवार शाळेत रॅलीचा समारोप करण्यात आला.
रॅलीच्या यशस्वीतेकरिता तुषार मंगर संगणक परिचालक, प्रतिभा कुणघाडकर गतप्रवर्तक,आशा स्वयंसेविका संगीता कोहळे, अल्का भंडारी, वैशाली उरकुडे,अविनाश टिकले,अतुल वासेकर तसेच शाळेतील शिक्षक जि एम मनबट्टूलवार,ए डी कुट्टरमारे, एच डी हिचामी,पी बी कन्नके, भांडारकर, गजभिये सर,एच डी खाडे, नागदेवते मॅडम, भोंगाडे मॅडम, बंडावार मॅडम,तुंपल्लीवर मॅडम व शाळेतील इतर शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले.