श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्युज जागर
देसाईगंज,दि.२७.०३.२०२३
माता वॉर्ड रहिवासी घनश्याम कोकडे हे १५ वर्षा पूर्वी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरु केला होता, आजही वृत्तपत्र विक्रेता ला ज्ञान वाटप करण्याचे साधन असे म्हंटले जाते, आपल्या साध्या व प्रेमळ स्वभावामुळे घनश्याम कोकोडेनी कमी वेळात आपली ओळख बनवीली आहे, अनेक वृत्तपत्रात प्रतिनिधित्व केलेले आहेत, तसेच कोरोना काळात सुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता घरा घरा मध्ये वृत्तपत वाटपाचे काम केले आहे, या व्यतिरिक्त अनेक सामाजिक, राजकीय व भ्रष्टाचार निर्मूलन संघटना या सारख्या संघटने मध्ये राहून गोर गरीब लोकांचे निष्पक्ष काम केले आहेत, अनेक लोकांना रक्त पुरवठा करून जीवदान देण्याचे काम सुद्धा केले, परंतु या कामाची कधी त्यांनी स्वतःची प्रशंसा केली नाही व स्वतः पत्रकार असून सुद्धा त्यांनी केलेल्या कार्याचे कधी वृत्त प्रसारित केले नाही, कोणतीही अपेक्षा न ठेवता निरंतर त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले ,अशा मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाच्या वृत्तपत्र विक्रेत्याचा आज आम आदमी पार्टी देसाईगंज तर्फे सत्कार करण्यात आला .
आम आदमी पार्टी कार्यालयात उपस्थित देसाईगंज तालुका संयोजक भरत दयलानी, शहर संयोजक आशिष घुटके ,सलाहकार दीपक नागदेवे ,तबरेज खान,अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद गडचिरोली सचिव भुवन भोंदे, नवेद खान ,प्रमोद दहिवले अतुल ठाकरे ,शिल्पा बोरकर ,नाजूक लुटे, वामन पगारे,सिद्धर्ध गणवीर, सामाजिक कार्यकर्ता मिलिंद सपाटे ,भ्रष्टाचार संघटना चे तालुकका अद्यक्ष योगेश नेवारे व अनेक आम आदमी पार्टी चे कार्यकर्ता उपस्थित होते.