चामोर्शी नगरपंचायतच्या वतीने दिव्यांगाना धनादेश वितरीत

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्युज जागर 

चामोर्शी,दि.०५/०४/२०२३

नगरपंचायत चामोर्शी अंतर्गत सन २०२२ – २०२३ या वर्षातील पात्र शहरातील ७५ दिव्यांग व्यक्तीना ५ टक्के निधी वाटपाचा कार्यक्रम नगरपंचायत सभागृहात आज दि . ५ एप्रिल रोजी करण्यात आले.
यामध्ये ४ दिव्यांग लाभ्यार्थाना धनादेशाद्वारे व ७१ दिव्यांगाना त्याच्या बॅकेच्या खात्यात जमा करण्यात आले. लाभार्थ्यी – प्रज्वल एकनाथ बोदलकर , चंदु विठोबा बुरांडे , भाविक देवाजी किरमे , पुष्पा दिलीप गेडाम यांना धनादेश देण्यात आले.
यावेळी धनादेशाचे वितरण नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , महिला बालकल्याण सभापती गिता सोरते , नगरसेविका प्रेमा आईचवार यांचे हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अधिक्षक मोरेश्वर पेंदाम , अभियंता निखिल कारेकर , कर निरीक्षक भारत वासेकर , लिपिक दिलीप लाडे , कुंन्दा बोदलकर व नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते .