सहावितील विद्यार्थिनीवर 22 वर्षीय युवकाचा लैंगिक अत्याचार – पोलिसांनी ठोकल्या आरोपीस बेड्या

चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

राजुरा,दि.०५/०४/२०२३                   

आरोपी हा नात्यातील

दिनांक 3 एप्रिल रोजी सदर पीडित शाळा सुटल्यावर खाऊ घेण्याच्या उद्देशाने राजुरा शहरातील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सहाव्या वर्गात शिकणारी मुलगी बाहेर निघाली असता तिथे असलेल्या 22 वर्षीय युवकाने तिला बोलावले. सदर युवक पीडितेच्या नात्यातील relative असल्याने मुलगी त्याच्याकडे गेली. त्यांनतर त्याने घरी पोहचवून देण्याच्या बहाण्याने तिला आपल्या दुचाकीवर bike बसविले.व जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला.news jagar

वेळ होऊनही मुलगी बसमध्ये न आल्याने चालकाने ही माहिती शाळेच्या मुख्याध्यापकांना principal दिली. शाळा प्रशासनाने चौकशी केली असता ती विद्यार्थिनी एका युवकाच्या दुचाकीवर बसुन गेल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी मुलीच्या पालकांना parents माहिती देऊन मुलीचा शोध घेण्यास सांगितले.minor girl rape by 22 years at rajura

मुलगी परस्पर निघुन गेल्याचे कळताच पालकांनी शोध सुरू केला मात्र सदर पीडिता काही वेळाने घरी परतली. पालकांनी मुलीची चौकशी केली असता नात्यातील 22 वर्षीय युवकाच्या दुचाकीने आपण शाळेतून आल्याचे तिने सांगितले. अधिक माहिती घेतली तेव्हा मुलीने त्या युवकाने आपल्याला जंगलात forest नेऊन अतिप्रसंग sexual assault केल्याचे पिडितेने सांगितले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच पीडितेच्या आईने राजुरा पोलीस ठाणे police station गाठून अत्याचाराची तक्रार नोंदविली.

प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी त्या युवकाच्या गावात जाऊन युवकाला अटक केली असुन वैद्यकीय तपासणीअंती त्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असल्याने पोलिसांनी युवकावर भा दं वी च्या कलम 376, 376 अ, ब, 363 तसेच बाल लैंगिक अत्याचारांच्या कलम 4 व 6 अन्वये गुन्ह्याची नोंद करून न्यायालयातून आरोपीची तिन दिवसांची पोलीस कोठडी घेतली आहे.