अतुल गण्यारपवार यांना बेदम मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांना तातडीने निलंबित करा.. सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेतून मागणी

प्रेस नोट 

येत्या दोन दिवसांत संबंधित विभागाने कारवाई न केल्यास जनआंदोलन व उपोषण करणार 

चामोर्शी येथे २० एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अतुल भाऊ गण्यारपवार यांना चामोर्शी येथील पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सकाळी ५ वाजता सुमारास पोलीस स्टेशन येथे बोलावून कोणतेही कारण नसताना अमानुषपणे मारहाण केली. यात अतुलभाऊ गण्यारपवार गंभीर जखमी झाले असून त्यांचे एक हात फॅक्चर झाले आहेत, सद्या त्यांचे गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे, ह्या अमानुष मारहाणीचा घटनेमुळे सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून त्यांनी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर त्वरित कडक कारवाई करून निलंबित करण्याची मागणी पत्रकार परिषदेतून केलेली आहे..

तसेच दिनांक १९/०३/२०२३ रोजी सेवा सहकारी संस्थेची निवडणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसतांनाही चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी दहशत निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला हि चुकीची बाब आहे. त्यामुळे वरील सर्व बाबींचा विचार करता अशा अधिकाऱ्यावर येत्या दोन दिवसांत त्वरीत कारवाई करुन त्याला तात्काळ निलंबित करावे अशी मागणी पत्रकार परिषदेतून सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.

कारवाई न केल्यास येत्या काळात सेवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जनआंदोलन, रास्तारोको, उपोषण, तसेच चामोर्शी शहर बंद करण्यात येईल. या पत्रकार परिषदेला सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश नैताम, उपाध्यक्ष एकनाथ बुरांडे, संचालक विश्वनाथ सोमनकर, मोरेश्वर चलकलवार, रोहिदास सहारे, पुंजाराम वासेकर,लक्ष्मन नैताम, अनिल नैताम, रामजी नरोटे अध्यक्ष,वामन कारडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.