नागभिड तालुक्यातील २४ सामाजिक कार्यकर्ते पुरुषांना “सुधारक सन्मान पुरस्काराचे” केले सन्मानीत

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर

तळोधी (बा.),दि.२६/०४/२०२३

महिला आर्थिक विकास महामंडळ, चंद्रपूर अतंर्गत स्थापित दिशा लोकसंचालित साधन केंद्र तळोधी (बा.)व्दारा नवतेजस्विनी – महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत नागभिड तालुक्यातील २४ व्यक्तीचा “सुधारक सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. राधाकृष्ण सभागृहात तळोधी(बा.) येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिशा लोकंसचालीत साधन केंद्राचे अध्यक्षा शितल बारसागडे या होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक माविम जिल्हा कार्यालयाचे ए.डी.सि.ओ. रुपेश शेंडे होते. तळोधी पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. गोवर्धन, सिएमआरसी सचिव प्रिया सोनटक्के, पर्यवेक्षक गेडाम, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

“महिला सक्षमीकरणा करिता पुरुषाचा सहभाग” या सामाजीक भावनेतुन कार्य करणाऱ्या नागभिड तालुक्यातील चोविस गावातील पुरुष कार्यकर्ते यांना दिशा लोकंसचालीत साधन केंद्रा अतंर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमात महिलांना सन्मानजनक सहकार्य करित असल्यामुळे त्यांचा यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पुरस्कार प्राप्त कार्यकर्ते राहुल रामटेके, परिश शेंडे, किष्णा शेंडे, श्रीनंदन गजभे, अनिल महाडोरे, अभिजीत बावने, युवराज शेंडे यांनी सत्कारा प्रसंगी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक विनोद मुगंमोडे, संचालन सहयोगीनी श्रिदेवी शेंडे, तर आभारप्रदर्शन सहयोगिणी जया मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भारती गेडाम, अतुल चव्हाण, सविता रामटेके यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला गावप्रतिनिधी, सिआरपी, व बचत गटातील महिला उपस्थित होत्या.newsjagar