श्री.अरुण बारसगडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
चंद्रपूर ,दि. ११/०५/२०२३
ब्रम्हपुरी दिनांक १३/०३/२०२३ रोजी आदर्श मीडिया एसोसीएशन च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा प्रियाताई झांबरे यांनी ब्रम्हपुरी उपवनसंरक्षक वनविभाग कार्यालय येथे एक साध्या भाषेत माहितीचा अधिकार अर्ज केला होता. त्या अर्जावर ब्रम्हपुरी वनविभाग कार्यालय चे जनमाहिती अधिकारी यांनी विहित कालावधीत माहिती दिली नाही. म्हणुन दिनांक १९/४/२०२३ रोजी रजिस्टर पोस्ट द्वारे अपील दाखल केली. अर्ज केल्यापासुन प्रियाताई झांबरे यांना वनविभागाचे अधिकारी कर्मचारी ब्रम्हपुरी डिवीजन यांचा फोन येत होता अर्ज परत घ्या नाहीतर माहिती प्राप्त झाली असे लिहुन दया असे बोलल्या गेले परंतु झांबरे यांनी फोन कडे किंवा कोणाच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही आणी भेट घेण्यास टाळत राहिल्या.newsjagar
प्रियाताई झांबरे या आपले कार्य प्रामाणिक करत असतांना दिनांक ११/०५/२०२३ ला अपील आहे त्या अगोदर १० मे २०२३ ला प्रियाताई झांबरे यांना मनसे चे जिल्हा प्रमुख विजय मराठे यांनी फोन करून भेटण्याचे बोलले , कशासाठी भेटायचे आहे असे विचारले असता विजय मराठे म्हणतात की उद्याला तुमची अपील आहे तर त्याच विषयावर भेटायचे आहे. यावर प्रियाताई मनसे जिल्हा प्रमुख विजय मराठे वर चिडल्या तर ते म्हणाले की मला समोरच्या लोकांनी सांगीतले. राजकीय पक्षाचा आणी वनविभागाचा संबध काय असेल असा झांबरे यांना प्रश्न पडला ?? माहितीचा अधिकार अर्ज करुन माहिती मागण्याचा अधिकार असतांना देखील जनतेला ब्रम्हपुरी वनविभागाचे अधिकारी हे अधिकारा पासुन वंचित ठेवण्याचे प्रयत्न का करत असतील. असा कोणता घोळ आहे ब्रम्हपुरी डिवीजन कार्यालयात.
मराठे यांच्यासोबत फोनवर झालेले संभाषण
प्रियाताई झांबरे यांचे म्हणाल्या की ब्रम्हपुरी डिवीजन वनविभागाचे अधिकारी राजकीय पक्ष मनसे च्या माध्यमातुन मला दबाव आणण्याचा प्रयत्न देत आहेत .उद्याला ११/०५/२०२३ रोजी झांबरे यांची प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहायक वनरक्षक एम. बी. चोपडे साहेब उपवनसंरक्षक कार्यालय वनविभाग ब्रम्हपुरी यांच्या दलनात माझी अपील आहे. या दरम्यान झांबरे यांच्या जिवाला कोणतीही जिवहानी झाल्यास याला जबाबदार मनसे चे चंद्रपुर जिल्हा प्रमुख विजय मराठे व ब्रम्हपुरी डिवीजन वनविभागाचे अधिकारी जबाबदार असतील असे प्रियाताई झांबरे यांनी बोलतांना सांगीतले.




