न. प. च्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर

श्री.अमित साखरे , गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर 

गडचिरोली,दि.१०/०५/२०२३

अतिक्रमण हटाव मोहिमेवर भेदभावाचा आरोप

गडचिरोली नगर परिषदेच्या वतीने दि. ९/०५/२०२३ रोजी गडचिरोली शहर व कॉम्प्लेस परिसरातील व्यावसायिकांच्या दुकानांनवर जेसीबी द्वारे कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले.नगरपरिषदेच्या या कारवाई मुळे लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे नागरिकांन मध्ये या कारवाईचा निषेध करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे कि, गडचिरोली नगर परिषदे द्वारा मंगळवार दि. ९/०५/२०२३ ला इंदिरा गांधी चौक व कॉम्प्लेक्स परिसरातील छोट्या दुकान व्यावसायिकांवर अतिक्रमण हटाव मोहीमे अंतर्गत नोटीस पाठवून कारवाई करण्यात आली. परंतु सदर कारवाई करताना नगर परिषदे द्वारा निवडक दुकानदारांच्याच दुकानांनवर कारवाई करण्यात आल्याने नगर परिषदेच्या या कारवाईत संशयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नगर परिषदेच्या या कारवाईमुळे लहान दुकानदारांन पुढे पुढील भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले असुन भविष्यात कोणता उद्योगधंदा करून आपला व परिवाराचा उदरनिर्वाह कशाप्रकारे होईल या द्विधा मनस्तीतीत सापडला आहे. या कारवाई संदर्भात आमच्या प्रतिनिधीने नगर परिषदेशी संपर्क साधला असता, नगर परिषदेचा फोन नॉट रिचेबल लागत होता. newsjagar

या कारवाई संदर्भात आमच्या प्रतिनिधीने दुकानदार व नागरिकांशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले कि, गडचिरोली हा जिल्हा उद्योग विरहित जिल्हा असुन नक्सलग्रस्त भाग आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक आपला व परिवाराचा उदारनिर्वाह करण्यासाठी छोटे दुकान रस्त्याच्या बाजूला थाटून आपली उपजिवीका करत आहे. नगर परिषदेने किंवा जिल्हा प्रशासनाने सदर दुकानदारांना शासकीय जागेवर गाळे तयार करून ते त्यांना व्यवसाया करिता उपलब्ध करून दिले तर त्याच्यावर रस्त्याच्या कडेला दुकान थाटून व्यवसाय करण्याची वेळ येणार नाही व महामार्गावर अतिक्रमण सुद्धा होणार नाही. परंतु जिल्हा प्रशासन व नगर परिषदेच्या वतीने अशी कोणताही सुविधा उपलब्ध करून न देता सरळ कारवाई करणे योग्य नसल्याचे सांगितले.