बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करण्यात यावी-काँग्रेस ओबीसी सेलच्या वतिने मुख्यमंत्र्यांकडे मागणी

श्री.भुवन भोंदे , प्रतिनिधी,न्युज जागर  

 

देसाईगंज, दि.०७/०६/२०२३

आपल्या देशात ओबीसींची संख्या ५४ टक्के असल्याचे नेहमीच सुतोवाच केले जाते.माञ त्यांची स्थिती सुधारावी,त्यांच्या शाळा, आरोग्य,शिक्षण,नोकऱ्याच्या स्थितीविषयी लोकसंख्या माहित झाल्याशिवाय यथोचित न्याय मिळणे अपेक्षित नाही. यास्तव नुकतेच ही आकडेवारी स्पष्ट करण्यासाठी बिहार राज्यात जातनिहाय जनगणना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यातही जातनिहाय जनगणना करण्याची मागणी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतिने देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की देशातील ५४ टक्क्यांमधल्या लोकांना मदत करायची असेल तर महाराष्ट्र राज्यात ३५० जाती आहेत. देशात आणखिही कितीतरी जाती असतील.त्यासाठी जातनिहाय जनगणना करणे अत्यावश्यक आहे.जातनिहाय जनगणना करून स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही राज्यातील ओबीसींना घटनादत्त अधिकार देण्यात आले नसल्याने आजमितीसही अनेक क्षेत्रात ओबीसींची गळचेपी होत आहे.राज्यात वारंवार ओबीसींना घटनादत्त अधिकार देण्याचे सुतोवाच करण्यात येते माञ जातनिहाय जनगणना करण्यात आली नसल्याने शासनाकडे ओबीसींची ठरावीक आकडेवारी किती हे अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही.यास्तव राज्यात जातनिहाय जनगणना करून कोणाची आकडेवारी किती हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.NewsJagar 

बिहार राज्यात ओबीसींना यथोचित न्याय देण्यासाठी अशी मोहीम हाती घेण्यात आली असुन जनगणना युद्धस्तरावर सुरु आहे.माञ महाराष्ट्र राज्यात याबाबत अद्यापही कुठल्याच हालचाली दिसुन येत नसल्याने ओबीसी वर्गात असंतोष खदखदु लागला आहे.आपल्या कार्यकाळात सदर काम पूर्णत्वास जाऊन ओबीसींना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.करीता बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करून आकडेवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी दिलेल्या निवेदनातुन केली आहे.

निवेदन देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी जे.पी. लोंढे यांनी स्विकारले असुन यावेळी ओबीसी काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव मनोज ढोरे,गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नंदू नरोटे, काँग्रेस युवा नेते पिंकु बावणे, माजी नगरसेवक गणेश फाफट,हरीष मोटवानी, शहजाद भाई,सागर वाढई, माजी उपसभापती नितीन राऊत,ओबीसी काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण कुंभलवार,विलास बन्सोड, जावेद शेख,साहील बुरडे, पराग शेंडे,विलास ठाकरे, सुप्रिया सहारे,पुष्पा कोहपरे, गणेश भोयर,आदित्य मिसार, सूरज ठाकरे,खुशाल राऊत आदी ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.