देसाईगज नगर परिषद नागपूर विभागातून क्रमवारीत प्रथम.

श्री.विलास ढोरे ,वडसा तालुका प्रतिनिधी,न्युज जागर 

देसाईगंज दि.०७/०६/२०२३

महाराष्ट्र राज्याचा माझी वसुंधरा अभियानां अंतर्गत भरीव कामगिरी करणाऱ्या नगर पालिकांचे पुरस्कार जाहीर झाले असून नागपूर विभागात देसाईगंज नगर पालिकेने प्रथम क्रमांक पटकावकेला असून महाराष्ट्र राज्यात देसाईगंज नगर परिषदने पंचवीस वे स्थान प्राप्त केले आहे.

महाराष्ट्र राज्य नगर विकास मंञालयाच्या नगर पालिका विकास कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियानाच्या गुणवत्ता स्पर्धेत देसाईगंज नगर परिषदेने नागपुर विभागातुन प्रथम तर महाराष्ट्र राज्यातिल नगरपरिषदेच्या यादीत २५ वे स्थान प्राप्त केले आहे नगर परिषद क्षेञात पर्यावरण संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगरविकास मंञालयाकडुन उत्कृष्ठ कामगिरी करणार्या नगर परिषदांना प्रोत्साहन पर बक्षिस म्हनुण १ कोटी ५० लक्ष रुपयाची राशी बहाल करण्यात येते या राशीचा उपयोग दे गंज नप क्षेञातिल विकास कामात करण्यात येईल अशी माहिती मुख्य अधिकारी डॉ कुलभुषन रामटेके यांनी दिली या पुर्वीही डॉ रामटेके यांच्या नेतृत्वात देश पातळीवरिल स्वच्छता अभियानात दे गंज नगर परिषदेला ५ कोटी रुपयाचा पुरस्कार जाहिर झाला होता बदली नंतर पुन्हा रुजु होऊन त्यांचे नेतृत्वात पुन्हा क्रमवारी प्राप्त करुन नप च्या शिरपेचात मानाचा तुरा चढविला असुन याचे सर्व श्रेय नगर परिषद क्षेञातिल नागरिकांना जात असल्याचे मुख्य अधिकारी डॉ कुलभुषण रामटेके यांनी म्हटले आहे. NewsJagar