अखेर येणोली मा येथील सरपंच अमोल बावनकर यांच्या पाठपुराव्याला यश

धामणगाव (माल) जाणे येणे साठी गाव जवडील घोडाझरी च्या कॅनल च्या पुलियाचा घोडाझरी कालवा दुरुस्ती करण्याची केली होती मागणी.

अरुण बारसागडे , नागभीड तालुका प्रतिनिधी न्यूज जागर 

नागभीड तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीला पाणीपुरवठा करणारा घोडाझरी तलाव यावर्षी अपेक्षेपेक्षा जास्त भरला आहे. तूर्तास पाणी मुबलक आहे. पाऊस बंद झाल्यास शेतीसाठी पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते. मात्र उन्हाळ्यात वारंवार सूचना देऊनही या तलावाच्या वितरिकांची सफाईच केलीच नसल्याची स्थिती आहे. अनेक पूल लिकेज आहेत, तर काही ठिकाणी कॅनॉलला मोठमोठे भगदाड पडले आहेत. त्याचीसुद्धा दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप येनोली माल येथील सरपंच अमोल बावणकर यांनी काही दिवसांपूर्वी करत . आता तरी घोडाझरी सिंचाई विभागाने दुरुस्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.
‌तालुक्यातील शेतकयांसाठी घोडाझरी तलाव हा वरदान आहे. या तलावाच्या पाण्याच्या भरोशावर हजारो शेतकरी अवलंबून आहे. हा तलाव इंग्रजकालीन असल्याने या तलावाच्यावितरिका जुन्या आहेत. मागील टोकावर असलेल्या धामणगाव माल व दिवसात जंगल परिसरात शेवटच्या सोनापूर येथील पुलांना मोठे भगदाडपडले होते. त्यांची अजूनही दुरुस्ती करण्यात आली नव्हती.
कांहीं कॅनॉल लिकेज आहेत. ते आहे त्याच स्थितीत आहेत. शिवाय तलावाच्या मुख्य वितरिकांमध्ये कचरा वाढलेल्या आहे. सद्यस्थितीत मुबलक पाऊस पडत आहे. मात्र अचानक पावसाने दडी मारली आणि उन्ह पडू लागल्यास तलावाच्या पाण्याची शेतकऱ्यांना गरज पडू शकते. अशावेळी नादुरुस्त कालव्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनई व्यक्त केली होती.
“घोडाझरी तलावाच्या मुख्य वितरिका बुजलेल्या आहेत. कुठे भगदाड पडले आहेत तर कुठे कॅनॉल लिकेज आहेत. अशा अनेक समस्या आहेत. याबाबत तोंडी तक्रारी केल्या असून वारंवार निवेदनेसुद्धा दिली आहेत. मात्र सिचाई विभागाने आत्ता उशिरा का होईना येनूली – धामणगाव जा जोडनार्या पुलीया च्या कामाला सुरुवात केली आहे