सावली
श्री. निखिल दुधे तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
सावली तालुक्यातील कवटी ,पारडी,रुद्रापुर, करोली, गेवराखुर्द, गेवरा भुज, कसरगाव,विहीरगाव,बोरमाळा, चिखली, डोंगरगाव, निफंद्रा, अंतरगाव, निमगाव, दाबगाव, थेरगाव, बेलगाव, चीचबोडी, मोखाडा, वाघोली, सामदा, सोनापूर, पेठगाव, डोनाळा, हराबा,लोढोली,साखरी, शिरशी, पेडगाव, जिबगाव,या परिसरातील धान,सोयाबीन,कापूस शेतीला मोठा पुराचा फटका बसला आहे घराची झालेली पडझड शेतमजुरांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांचे हाल बेहाल झालेले आहेत. पाचदा आलेल्या पुराने शेतातील पीक वारंवार पाण्याखाली येऊन शेतकऱ्याच्या हातात पीक येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र सरकारने पाचव्यांदा आलेल्या पुराचे पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी. गोविंदा खेळाला राज्य सरकार मान्यता देते त्यांची विमा पॉलिसी 10 लाख मग शेतकरी विमा काढतो त्याचं काय? किती विम्याची रक्कम मिळतो शेतकऱ्यांना या काळात मातीत घामाने चिंब अंगाला लागलेली माती काबाडकष्ट करून जमिनी शी खेळ खेळणाऱ्या माझ्या बळीराजाला अडचणीत पिक कवच द्या. मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ नका चोडू हक्काचे पैसे देऊन धीर द्या. आजच्या घडीला शेतकऱ्यांनी आपल्या जवळची होती नव्हती संपूर्ण ताकद लावून शेती हंगाम केला परंतु मानवनिर्मित धरणामुळे शेतीचे वाटोळे केले. वाढलेल्या महागाईच्या भडक्याने आधीच बेजार झालेली जनता,शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे. रासायनिक खताचे वाढलेले भाव, महागडी औषध, फवारणी मजुरी याचा अंदाज काढला तर आजच्या घडीला शेती करणे परवडत नाही. शेतकरी आपल्या पिकाचा विमा काढतो परंतु विमा कंपनी तुटपुजी मदत देतात. शासनाने या परिसरावर अन्यायच करीत आलेला आहे. आजची परिस्थिती बघता नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून हेक्टरी 75000/- हजार रुपये जाहीर करून ओला दुष्काळ करण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया नगरपंचायत सावली उपाध्यक्ष संदीप पुण्यपकार, सामाजिक कार्यकर्ते आकाश खोब्रागडे, नगरसेवक प्रीतम गेडाम, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गेडाम, नगरसेवक अंतबोध बोरकर, नगरसेवक प्रफुल वाळके,नगरसेवक सचिन संगिड़वार,नगरसेवक नितेश रसे यानी शासनाला मागणी केली आहे.