मच्छी खडयामुळे अपघाताची शक्यता अपघाताचा धोका चामोर्शी घोट रस्त्याची झाली दुरावस्थ चामोर्शी:-तालुक्यातील चामोर्शी ते घोट या मुख्य मार्गाचे डाम्बरिकरण उखडले असून अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.मात्र याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.येथील मुख्य मार्गाची दुरावस्था झाली आहे.रस्त्याच्या कडेला काही अंतर नसोडता नाल्याला पकडूनच मच्चीचे खड्डे खोदण्यात आले आहेत.एकीकडे विहीर तर एकीकडे खड्डा अशी अवस्था वाहनधारकाची झाली आहे.त्यामुडे थोडी जरी गाडी रस्त्याच्या कडेला उतरली तर अपघात होण्याची दाट शक्यता आहे.चारचाकी एक वाहन त्या रस्त्याने जात असली की,दुसऱ्या दुचाकी वाहनाला जाण्याकरिता मार्ग राहत नाही.एवढी गंभीर समस्या असूनसुद्धा लोकप्रतिनिधी व बांधकाम विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष्य करीत असल्याचा आरोप चामोर्शी तालुक्यातील जनता करीत आहे.या खड्याच्या रस्त्यामुडे बहुतेक प्रवाश्यांना अपंगत्व पत्करावे लागले आहे.चामोर्शी घोट मुख्य मार्ग असून या रस्त्यावर वाहन चालवताना वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या मार्गावर मोठया प्रमाणात अपघात होत असतात.अनेकांना यात जीव गमवावा लागला आहे.