देवनिल विद्यालय टेकाडी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन संपन्न

देवनिल विद्यालय टेकाडी येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन संपन्न

मुल . धर्मेंद्र सुत्रपवार

विद्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल द्वारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष देवरावजी भांडेकर माजी आमदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश सावरकर,प्रतिष्ठित नागरिक अनिल बोमनवार , पालक रवि चौधरी, विनोद गोहणे,ईश्वर जराते,शरद गणवीर, अनिल जक्कुलवार,किसन गुरनुले, अनंता मोहुर्ले, विलास जक्कुलवार, प्रशांत जंपलवार, वैशाली बोमनवार यांची उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी मंगेश पोटवार अध्यक्ष तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि गरजु विद्यार्थ्यांना नोटबुक आणि पेन साहित्य उपलब्ध करून दिले यावेळी आकाश येसनकर आणि रोहित कामडी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी क्रीडा स्पर्धा, गणित संबोध परीक्षा, निबंध स्पर्धा इत्यादींचे मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले प्रास्ताविक सुशिला उडाण तर संचालन समृध्द नागोसे आणि आभारप्रदर्शन आर्या जक्कुलवारने केले.