भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव तथा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न-

भगवान विश्वकर्मा जयंती महोत्सव तथा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न-

मुल तालुका प्रतिनिधी.

विश्र्व ब्राम्हण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल व्दारे भगवान विश्र्वकर्मा मुर्ती स्थापना सकाळी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न करण्यात आली, तसेच विश्र्व ब्राम्हण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल व्दारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेल्या , ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री वसंतराव जिरकुंटवार विश्र्व ब्राम्हण पांचाळ समाज, बहुउद्देशीय संस्था मुल, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ . चक्रपाणी चोप्पावार, श्री मुकुंद दुबे उपाध्यक्ष केमिस्ट्र ॲड डगिस्ट, श्री अजय गोगुलवार सामाजिक कार्यकर्ता, श्री जीवन कोंतमवार, श्री रत्नाकर बोगुजवार, श्री अशोकराव मेडपल्लीवार, श्री मोती टहलियानी माजी सभापती कूषी उत्पन्न बाजार समिती मुल, श्री अनिल दागमवार,ह्या पाहुण्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,प्रतिष्ठित व्यापारी नागरिकांचे विश्र्व ब्राम्हण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल व्दारे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले तथा विश्र्व ब्राम्हण पांचाळ समाज वतीने सकाळी गांधी चौक मुल येथुन कलश रॅली काढण्यात आली , ह्या कार्यक्रमात गायन,नुत्य ,रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या विजेत्यांना प्रोत्साहन बक्षीस वितरण करण्यात आले, समाजासाठी दर वर्षी स्वतः बचत उपक्रम करुन ह्या वर्षी सुध्दा श्री संदीप नारायण बद्देलवार यांनी १६,२५१/-रुपये मंदीराला दिले, श्री भास्करराव कत्रोजवार कडून साऊंड सिस्टीम व घंटी मंदिराला भेट दिली, तसेच श्री राजेश अशोकराव आबोजवार यांनी भगवान श्री विश्र्वकर्मा मुर्ती भेट दिली,यांचे पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल चे सचिव श्री विजय वैरागडवार यांनी आभार मानले ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संजय येरोजवार कार्याध्यक्ष विश्र्व ब्राम्हण पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल

यांनी केले, तसेच कार्यक्रमाचे संचालन वुंदा पगडपल्लीवार तर आभार प्रदर्शन श्री विजय वैरागडवार सचिव पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल यांनी केले ह्या कार्यक्रमात बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते