प्रियकराने शिवीगाळ केल्याने 21 वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

 श्री.अमित साखरे , उपसंपादक न्यूज जागर 
चामोर्शी:-

येथील रहिवाशी असलेल्या तरुणीला तिच्याच प्रियकराने शिवीगाळ करून मारहाण व धमकी दिल्याने सदर तरुणी आत्महत्या केल्याची घटना ०२ आगाष्ट रोजी चामोर्शी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली .
गणेशनगर येथील 21 वर्षे तरुणी ही मागील दोन- तीन वर्षापासून नागपूर येथे शिक्षण घेत असताना नागपूर येथील विद्या बजाज कंपनीमध्ये पार्ट टाईम जॉब करीत होती. व तिला नीट परीक्षेची तयारी करायची असल्यामुळे जून 2022 मध्ये नागपूर येथून चामोर्शी येथील राहते घरी आली होती 17जुलै रोजी मुलीने नीट ची परीक्षा दिली होती त्यानंतर सदर मुलगी घरी आईसोबत वास्तव्यास होती परंतु ती नागपूर वरून आले पासून तणावात असल्याचे दिसून येत होते. त्यावेळी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने स्वतःच्या आईला सांगितले की माझे सौरभ अधिकारी राहणार घोट या मुलासोबत प्रेम संबंध असून त्याचे सोबत लग्न करायचे आहे परंतु तो मला आता टाळा टाळा करीत असल्यामुळे मी तणावात आहे असे सांगितले. व दिनांक ०2आगस्ट रोजी राहते घरातील बेडरूम मध्ये चादरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तिला
पुढील उपचाराकरिता गडचिरोली शासकीय रुग्णालय येथे भरती केले. उपचारादरम्यान ती 10आगस्ट 2022 रोजी मरण पावली. सदर मुलीच्या आईने गडचिरोली पोलिस स्टेशनला तोंडी रिपोर्ट दिली दरम्यान 19 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी माझी राहते घरातील बेडरूम मधील साफसफाई करीत असताना बेडरूमच्या बेडवरील गादी खाली मला 14 जून रोजी लीहलेली एक चिठ्ठी मिळाली सदर चिट्टी मध्ये हिंदी बंगाली भाषेचे लिखाण केलेली दिसूनआले. चिठ्ठी मध्ये नामे सौरभ अधिकारी यांनी खूप जास्त मानसिक त्रास दिला असून सौरभ अधिकारी यांनी प्रेम संबंध असताना शिवीगाळ करून धमकी देऊन महाराण केली आहे. व तो माझ्याशी लग्न करणार नसल्यामुळे मला जीवन जगणे असह्य झाले असून मरावे वाटत असल्याचे चिठ्ठी मध्ये नमूद केल्याचे मला दिसून आले. त्यामुळे शिवीगाळ करून जीवे मारायची धमकी दिल्यामुळे व मारहाणं केल्यामुळे मानसिक तणावात राहून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्यामुळे माझी मुलगी आत्महत्या केलेली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे त्यामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा सौरभ अधिकारी यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशीही तक्रार सदर मुलीच्या आईने पोलीस स्टेशन चामोर्शी येथे दाखल केली आहे. चामोर्शी पोलिसांनी भादवी १८६० नुसार ३०६ कलमनव्ये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चामोर्शी पोलिस करीत आहेत.