चामोर्शी – स्वातंत्र्याच्या अमृत वर्षानिमित्य आरोग्य विभाग चामोर्शीच्या वतीने राष्ट्रीय किशोर स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत किशोरवयीन मुलामुलींची आरोग्य तपासणी व मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य श्री. रा. ना. ताजने सर उपस्थित होते. प्रमुख पाहूणे म्हणून श्री मोरांडे सर, निकोडे सर व आरोग्य विभागाचे श्री पुरुषोत्तम घ्यार साहेब व नागेश मादेशी साहेब उपस्थित होते.
श्री नागेश मादेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ताण तणाव व्यवस्थापन, आत्महत्या प्रतिबंध, मोबाईलचा अतीवापर,एच आय व्ही /एड्स, इ. विषयावर मार्गदर्शन केले.
तसेच श्री पुरुषोत्तम घ्यार यांनी सुद्या आजच्या विद्यार्थ्यांने ताणतणावापासून दूर कसे रहावे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री खेवले यांनी केले.