मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या साडेसात फूट लांबीच्या अजगराला स्वाब संस्थेच्या वतीने सोडवून सुरक्षित ठिकाणी सोडून दिले जीवदान . 

श्री.अरुण बारसागडे प्रतिनिधी

 

नागभीड तालुक्यातील आलेवाही गाव तलावाच्या सांडव्यावर मच्छीमारांनी लावलेल्या जाळात अडकलेल्या साडेसात फूट लांबीच्या अजगराला स्वाब संस्थेच्या सदस्यांनी आज सोडवून जीवदान दिले.

सदर सापाबद्दल मच्छीमार जाळे तपासायला गेले असता साप अडकल्याची माहिती मिळतात त्यांनी सर्पमित्रांना या संदर्भात माहिती दिली त्यानुसार स्वाब संस्थेच्या सर्पमित्रांनी आलेवाही तलावातील अडकलेल्या अजगर सापाला सुरक्षितपणे सोडवून नंतर त्याच जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडून दिले.

यावेळेस वनरक्षक चौधरी, वनमजूर उईके, पी. आर. टी ‌. सदस्य सचिन रामटेके, सिद्धार्थ सुकदेवे हे तर संस्थेचे अध्यक्ष व सर्पमित्र कायरकर, महेश बोरकर, हितेश मुंगमोळे, प्रतिकार बोरकर, व मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष उपस्थित होते.
विशेष म्हणजे या पावसाळ्यातील याच महिन्यात मच्छीमाराच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जाळ्यात अडकलेल्या 7 अजगरांना व व्यवस्थित सोडवून संस्थेमार्फत जीवदान देण्यात आले . तर इतर विषारी बिनविषारी अशा विविध 58 सापांना ‘स्वाब’ संस्थेच्या सदस्य/ सर्पमित्रांनी त्यांचे प्राण वाचवून जीवदान दिले. त्यांच्या या कार्याबद्दल वनविभाग व परिसरातील लोकांद्वारे कौतुक केलं जातं आहे.