गडचिरोली मध्ये पुन्हा रानटी हत्तीचे आगमन

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर 

मागील काही दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात परराज्यातून आलेल्या रानटी हत्तीने धूमाकुळ घातला असल्याने परिसरातील नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे कि, गडचिरोली जिल्ह्याच्या सिमावर्ती भाग असलेल्या धानोरा तालुक्यात मागील काही दिवसापासून परराज्यातून आलेल्या रानटी हत्तीच्या कळपाने शेत-शिवार तथा गावात घुसून घरांची नुकसान करत असल्यामुळे परिसरातील नागरिक हत्तीच्या भितीने सुरक्षित ठिकाणचा आसरा शोधून राहत असल्याची चित्रे दिसत आहे.

या अगोदर सुध्दा अशाच प्रकारे हत्तीचा कळप येऊन शेती व घरांची नासधुस केली होती, त्या संकटातून सावरण्याअगोदरच पुन्हा एकदा रानटी हत्तीच्या कळपाने जिल्ह्यात येऊन धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सदर हत्तीपासून लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. सदर आलेले संकट लक्षात घेता वनविभागातर्फे धानोरा परिसरात दिवसरात्र हत्तीच्या कळपावर नजर ठेवल्या जात आहे. हे हत्ती दिवस जंगलात घालविल्यानंतर मात्र रात्रीच्या सुमारास हे हत्ती अन्नाचा शोध घेत जवळील गावात दाखल होत असल्याने त्यांना नियंत्रित करणे अवघड होत आहे. मुरूमगाव वनपरिक्षेत्रात सध्या या हत्तींचे बस्तान असून ह्याची संख्या 30 च्या आसपास असल्याचे बोलले जात आहे.