चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
चामोर्शी:- ग्रंथालय लोकाभिमुख करणारे डॉक्टर रंगनाथन यांची जयंती केवलरामजी हर्डे वाणिज्य महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागातर्फे नुकतीच साजरी करण्यात आली. आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहिती शाखामध्ये जी प्रगती दिसून पडत आहे त्याचा सर्वांगीण श्रेय डॉक्टर एस. आर. रंगनाथन यांना मिळते. यावेळी पुस्तकाचे महत्व व उपयोग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये निरंतर राहावे या दृष्टीने ग्रंथालय विभाग सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकाप्रती गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे, संस्थेच्या सचिव स्नेहा हरडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हिराजी बनपुरकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले असून विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाच्या माध्यमातून आपली प्रगती साधावी व यश प्राप्त करावे असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर पवन नाईक ज्येष्ठ लिपिक किशोर गेडाम ग्रंथालय सहाय्यक अविनाश चौधरी व बीकॉमचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.