राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आष्टी येथे रास्ता रोको चक्काजाम आंदोलन

श्री.अनिल गुरनुले , न्युज जागर प्रतिनिधी 

आष्टी

आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज सकाळी 9 वाजता पासून आंदोलन करण्यात आले यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नागपूर विभागीय अध्यक्ष शाईन भाभी हकीम यांच्या नेतृत्वात आज आष्टी येथे आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले त्यांच्या प्रमुख मागण्या स्विकारण्याकरिता चामोर्शी येथील तहसीलदार नागटीळक यांनी स्वीकारले यावेळेस आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे उपस्थित होते .
गडचिरोली जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा,
सुरजागड लोहखनीज प्रकल्प मध्ये स्थानिक युवकांना रोजगार देण्यात यावे ,सुरक्षा रक्षक म्हणून त्या त्या गावातील युवकांना प्राधान्य देऊन नियुक्ती करावी व रोजगार देण्यात यावा,
आष्टी-आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. , आलापल्ली- अहेरी – महागाव रस्त्याचे तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी..,
कोनसरी घाटकुर रस्त्याचे तात्काळ सुधारणा करावी व जडवाहतूक बंद करावे.,
आष्टी येथील वैनगंगा नदीवरील पुलाचे काम तात्काळ पूर्ण करावे,कोनसरी लोहप्रकल्पामध्ये स्थानीक बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे,आलापल्ली ते सिरोचा राष्ट्रीय महामार्ग चे निविदा प्रक्रिया पुर्ण झाली असून एक महिन्याच्या आत काम तात्काळ सुरु करावे अन्यथा महामार्गावर सुरू असलेली वाहतूक बंद करून आंदोलन करण्यात येणार,
आष्टी आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर सुरजागड लोहखनीज प्रकल्पातील वाहतूक ट्रकवर झाकण्यात यावे धुडीमुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे, मेडीगट्टा धरणामुळे आपल्या शेतकऱ्याचा कोणताही फायदा नसताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयामुळे धरणातून येणाऱ्या बॅक पाण्यामुळे सिरोचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुर परस्थिती मुळे शेती, घरे, जनावरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी सदर कराराबाबत पुनर्निरिक्षण करावे,सुरजागड लोहखनीज प्रकल्पातून कच्चा माल घेऊन जाणारे ट्रक पर्यावरण नीयमांचे उल्लघन करत आहेत तरी, तात्काळ त्या ट्रकवर ताडपत्री बांधून जळणवळण करावे., आष्टी गावाला नवीन तालुका म्हणून घोषीत करण्यात यावे,
वरील मागण्या त्वरीत मंजुर करण्यात यावे अन्यथा पुढे अजुन तीव्र आंदोलन
करण्यात येईल. असा इशारा शाहीन भाभी हकीम महिला अध्यक्ष तथा नागपूर विभागीय अध्यक्ष , रवि वासेकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली, रिंकू पापडकर,लीलाधर भरडकर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गडचिरोली ,बबलु भैय्या हकिम,पुष्पा बुर्ले महिला जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली, हेमंत भाकरे जिल्हासंघटन सचिव गडचिरोली,विजय गोरडवार शहर अध्यक्ष गडचिरोली,गोलू पोटवार,राहुल डांगे आष्टी शहर अध्यक्ष ,प्रणय बुर्ले जिल्हासरचिटणीस ,सागर जम्पलवार विद्यार्थी सेल तालुकाध्यक्ष चामोर्शी,रुपेश बुरमवार ,स्वप्नील श्रीरामवार अहेरी राष्ट्रवादी यूवा कांग्रेस तालुका अध्यक्ष श्रीनिवास वीरगोंनवार अहेरी राष्ट्रवादी कांग्रेस तालुका अध्यक्ष ,मलान्नाजी बुरमवार,संजीव गोसावी,नेमाजी घोगरे,प्रभात मंडल, शैलेंद्र खराती ,श्रीकांत मल्लेलवार,महेंद्र बाबा आत्राम , संजय कोचे, बंटी गेडाम तसेच बहुसंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते .