श्री.निखिल दुधे , न्युज जागर प्रतिनिधी
सावली तालुक्यातील असोळ मेंढा तलावाच्या नहारमध्ये कपडे धुण्याकरिता आई सोबत काजल, बहीण सुश्मिता , व भाऊ राहुल मक्केवार आणि त्यांचे मित्र रोहित आणि अनुराग सोबत गेले होते त्यापैकी ४ जण आंघोळ करीत असतांना पाण्यात बुडाले , हि बाब सोबत असलेल्या काजल ला लक्षात येताच तिने मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली , बालके बुडत असल्याने कल्लोड झाल्याने जवळच असलेल्या शासकीय गोडाऊन मधील मजूर श्री. बालूभाऊ भंडारे आणि श्री. विशाल दुधे यांनी त्वरित त्या नहारात उडी घेत सर्वांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न केले असता ४ जणांचे प्राण वाचविले मात्र त्या बालकांना वाचविण्यासाठी उडी घेतलेली काजल पाण्याच्या प्रवाहात वाहून घेली.
घटनेची माहिती प्रशासनाला मिळताच बोटी द्वारे शोध कार्य केले असता २४ तासापर्यंत काजल चा पत्ता लागला नाही , दुसऱ्या दिवशी शनिवार दि २७ ऑगस्ट २०२२ ला सिंगापूर पासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर काजल चा मृतदेह तरंगतांना आढळून आला , पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ग्रामीण रुग्णालय सावली येथे पाठविले.
पुढील तपास पो. निरीक्षक श्री. आशिष बोरकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक चिचघरे , मडावी, पोलीस हवा . धीरज पिदूरकर , दीपक चव्हाण, लाटकर, अधिक तपास करीत आहेत
सदर शोध कार्यात कुटुंबातील नातेवाईक , जलतरन पटू नितीन पाल व त्यांची चमू यांनी शोध कार्यात मदत केली