राष्ट्र सेवा दला तर्फे तान्हा पोळा साजरा

जिल्हा प्रतिनिधी न्युज जागर 
राष्ट्र सेवा दल गडचिरोली तर्फे नवेगाव येथील विघ्नर्हता नगर मध्ये तान्हा पोळा भरविण्यात आला होता. या तान्ह्या पोळा मध्ये परिसरातील लहान मुलांनी आपले नंदी आणून कार्यक्रमाची शोभा वाढविली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्र सेवा दलाचे पुर्णवेळ कार्यकर्ता उमेश ऊईके, माजी सेवा दल मंडळ सदस्या सारिका मोगरे, लता देसाई, पराग डोकरमारे, श्रावणी भांडेकर, केतन मिसरी, माही ऊईके, शिवालीका भांडेकर, पिहू ऊईके, अर्थव बच्चलवार, रूद्र येंदडवार, हनी बच्चलवार, सारंग मडावी सहीत परिसरातील नागरिक उपस्थित होते.