भुस्खलन झाल्याने घर 60 ते 80 फुट गेले खड्यात

जिल्हा प्रतिनिधी न्युज  जागर

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील अमराई वार्डात वेकोलिच्या खाणी लगत भूस्खलन झाल्याने गजानण मडावी यांचे घर चक्क 60 ते 80 फुट आत जमिनीत घुसल्या गेल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. सुदैवाने यावेळेस कोणतीच जिवीतहानी झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी  जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.  यावेळी नायब तहसीलदार खंडारे, मंडळ अधिकारी नवले, घुग्घुस पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुसाटे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. हा जिल्ह्यात कोळसा व सिमेंट कारखान्यानी व्यापला आहे. जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, कोरपणा, बल्लारशाह आदि तालुक्यात वेकोलिच्या कोळसा खाणी असून या परिसरात वेकोली तर्फे कोळसा काढण्याकरीता जमिनीत मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात येते. त्यामुळे या तालुक्यातील जमिनी पुर्णतः पोकळ झालेल्या आहेत. या परिसरात दरोरोज अश्या घडामोडी होत असतात. त्याचाच प्रत्यय म्हणून मडावी यांचे अर्ध्यापेक्षा जास्त घर या घटनेत खड्यात गेले आहे. पाहणी दरम्यान प्रशासनाने  जवळपासचा परिसर खाली केला  आहे.

परिसर खाली झाल्यावर येथे चोरी सारख्या घटना घडु शकतात. त्यामूळे येथे पोलिस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्याचे निर्देश पोलिस निरिक्षकांना दिले आहे. सदर परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्याच्या सुचनाही त्यांनी महावितरण विभागाला केल्या आहे. सदर घटनेची माहिती वेकोलीचे वणी एरियाचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांना दिली आहे. वेकोलीनेही त्यांच्या सुरक्षा रक्षक व आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला येथे तात्काळ पाचारन करण्यात आले आहे. घर खड्यात गेल्याने कुटुंबाला आर्थिक नुकसान झाल्याने वेकोलिने आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे .