मोहाळी येथे तान्हापोळ्याला वंचित बहुजन आघाडी कडुन बक्षीस वितरण.

श्री. अरुण बारसागडे , नागभीड तालुका प्रतिनिधी, न्युज  जागर  

 

तालुक्यात मोहाळी( मो.) येथे ग्रामपंचायत च्या माध्यमातुन तानापोळा आयोजित केला जातो.या तान्हायापोळ्यात ग्रामपंचायत चे वेगळे बक्षीस असते तर वंचित बहुजन आघाडी गाव शाखेच्या माध्यमातुन वेगळ्या निकषावर प्रोत्साहन पर वेगळे बक्षिस दिले दरवर्षी प्रमाने या वर्षी सुध्दा विदर्भ समन्वयक अरविंद सांदेकर यांच्या सहकार्याने,अश्विन मेश्राम यांच्या मार्गदर्शनात व प. स प्रमुख धर्मविर गराडकार यांच्या नेतृत्वात मोहाळी येथे तान्हापोळा निमित्त बालगोपालांना वही , बुक, पेन शैक्षणिक साहीत्य वंचित बहुजन आघाडी तर्फे वितरण करण्यात आले यावेळी क्रिश शेंन्डे ला प्रथम , रुत्वी शेंन्डे द्वितीय , शौर्य चंदनबावने तृतीय , साहील वाकडे चौथै , तथा ऐजंल गराडकार ला पाचवे बक्षिस व ट्राफी वंचित बहुजन आघाडी चे ग्राम सदस्य विरु गजभे , ज्योती बन्सोड , तथा तुळसाबाई गजभे,विद्या गेडाम , साजेश गेडाम यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी गाव शाखेतील जेष्ठ पदाधिकारी नरेश रामटेके, दिवाकर वासनिक , कार्तिक गेडाम , प्रल्हाद गेडाम , किशोर मेश्राम , प्रशांत जांगडे, यशवंत कोलते , सौरभ बन्सोड , अर्जुन गेडाम , हेमंत जाभुळे, महेश गेडाम , व ईतर कार्यकर्त्ये उपस्थित होते