ग्रामीण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

सिरोंचा तालुका प्रतिनिधी , न्युज  जागर

बैल जोडीच्या वाढत्या महागाईने जनता सध्या हैराण झाली आहे.
जनतेत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे जनता पर्यायी व्यवस्थेच्या शोधार्थ आहे.सर्वसामान्य जनतेला दोन चाकी गाड्या,चारचाकी, गाड्या, ट्रक्टर खूप आहेत. मात्र शेती कामासाठी वेळेवर ट्रक्टर मिळत नसल्याने सिरोंचा तालुक्यातील तेलंगणा सिमेलगत असलेल्या जाफराबाद येथील राजालिंगु दुर्गम, या शेतकऱ्यांने मोटार सायकलला जुगाड करून शेती कामासाठी वापर करीत आहे विशेष म्हणजे हि जुगाड केलेल्या मोटार सायकलला मागे दोन्ही बाजूला लोखंडी चाके लावले आहेत व मागे लोखंडी नांगर लावला असून हि मोटार सायकल चक्क मागे पुढे होत असते.

या मोटार सायकल जुगाड करणाऱ्या शेतकरी पुत्राला विचारणा केली असता त्यांने माझी परिस्थिती हलाखीची असुन माझे शिक्षण पाचवीपर्यंत झाले आहे व माझे वडील वारले असल्याने माझ्यावर शेती करुन जिवन जगण्याची वेळ आली तर मी एक लहानसा वेल्डिंग दुकान टाकला व माझ्याकडे शेती आहे पण बैल जोडी नाही ट्रक्टर तर वेळेवर मिळत नाही अशा विचारात राहून मी युट्यूबवर पाहीले व मोटार सायकलच्या सहायाने शेती करता येते मग मी युट्यूबवर पाहून लागणारे साहित्य आणुन हि शेती उपयोगी जुगाड गाडी बनविली व या अंदाजे वीस हजार रुपये खर्च आल्याची माहिती राजालिंगु दुर्गम दिली त्याची ही अनोखी गाडी पाहण्यासाठी विविध भागांतील नागरिक त्याच्या वस्तीवर येऊ लागले आहेत.बनवलेल्या गाडीची एखादी राईड मारून जातात.सध्या या बाईकची जाफराबाद गावच्या आसपासच्या परिसरात जोरदार चर्चा असून राजालिंगु दुर्गम याचे कौतुक होत आहे.

गावकऱ्यांनी शासनाकडून राजालिंगु दुर्गम ला उद्योग उभारण्यासाठी मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याच्या या अनोख्या गाडीच्या प्रयोगाने त्यांच्या इच्छा ,आकांशा पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.