श्री. अनिल गुरनुले , न्यूज जागर प्रतिनिधी
नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना तीन नक्षलवाद्यांस अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलाचे जवानांना यश प्राप्त झाले आहे.
सदर नक्षलवाद्यांना दोन वेगवेगळया घटनांमध्ये अटक करण्यात आले असुन, मौजा कोयार जंगल परीसरामध्ये अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये रमेश पल्लो वय-29 वर्ष रा. कोयार ता. भामरागड , तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी वय- 23 वर्ष रा. पद्दुर ता. भामरागड जि. गडचिरोली यांचा समावेश असुन, मौजा झारेवाडा जंगल परीसरामध्ये अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे वय 27 वर्ष रा. झारेवाडा ता. एटापल्ली याचा समावेश आहे.
रमेश पल्लो सन 2019 मध्ये भरती होवुन कंपनी 10 चा एक्शन टिम मेंबर व स्कॉऊट टिम मेंबर म्हणुन कार्यरत होता.
त्याचा 03 खुन, 08 चकमक, 01 जाळपोळ, 01 इतर अशा एकुण 13 गुन्ह्रामध्ये समावेश आहे. रमेश पल्लो याचेवर 4 लक्ष रूपयेचे बक्षिस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे
तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी हि सन जुलै 2015 मध्ये ती नक्षलमध्ये भरती झाली. सन 2016 ते 2019 पर्यंत ती प्लाटुन क्र 7 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती, सन 2019 ते आतापर्यंत ती कंपनी क्र. 10 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती
तिचा 04 खून व 03 चकमक अशा एकुण 07 गुन्ह्रामध्ये समावेश आहे, तानी ऊर्फ शशी चमरु पुंगाटी हीचेवर 4 लक्ष रूपये चे बक्षिस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे
नामे अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे हा सन 2010 साली पेरमिली दलम सदस्य पदावर भरती होवुन 2013 पर्यंत कार्यरत होता, सन 2013 पासुन प्लॉटुन क्र. 14 मध्ये कार्यरत होता, ऑगस्ट 2013 मध्ये सिरोंचा दलममध्ये बदली होवुन 2018 पर्यंत सदस्य पदावर कार्यरत होता.सध्या तो भामरागड दलममध्ये कार्यरत होता.
त्याचा 7 खुन, 9 चकमक, 2 जाळपोळ, 2 दरोडा, 01 जबरी चोरी व इतर 03 अशा एकुण 24 गुन्हयामध्ये समावेश आहे.अर्जुन ऊर्फ महेश रैनु नरोटे याचेवर 02 लक्ष रूपये चे बक्षिस महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे
गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे सन 2021-22 या दोन वर्षाच्या कालावधीत आतापर्यंत एकुण 57 जहाल नक्षलवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा.,मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा.यांचे नेतृत्वात पार पडली.
मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी नक्षलवादयांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र केले असुन नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.