खुल्या पटांगणात खेळात असलेल्या एका ५ वर्षीय मुलीवर एका ३० वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले , युवराज बळीराम मेश्राम असे त्या नराधमाचे नाव असून तो वांद्रा येथील रहिवासी आहे.
ब्रम्हपुरी तालुक्यातील वांद्रे येथील गुरुकुंज आश्रमाच्या पटांगणावर काही मुली खेळत होत्या , तेव्हा युवराज बळीराम मेश्राम (३०) याने तेथील एका मुलीला उचलून नेले व अत्याचार केला असता बाकीच्या मुली घाबरून पळून गेल्या , आश्रमाच्या पटांगणाच्या बाजूला असलेल्या पानटपरीवर सदर मुलीच्या वडिलांना तिच्या ओरडण्याचा आवाज आला असता त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली तेव्हा नराधम हा सदर मुलीसोबत होता .
घटनेची माहिती मेंडकी पोलिसांना देऊन त्यांना पाचारण करण्यात आले, सदर मुलीला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले, तपासाअंती नराधम युवराज याने अत्याचार केला हे सिद्ध झाल्याने त्याला अटक करून त्याचेवर कलम ३७६-ए , बी., आय .पी.सी. कलम ६ आणि १० , पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला , पुढील तपास ब्रम्हपुरी पो.स्ट, च्या पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर करीत आहेत