एटापल्ली न्युज जागर प्रतिनिधी
उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पोलीस स्टेशन एटापल्ली तील जलद प्रतिसाद पथक यांनी एटापल्ली गट्टा मार्ग महादेव मंदिर रोड जवळ पोलीस शिपाई ने पोलीस पार्टी कमांडर वर झाडले गोडी यात पार्टी कमांडर गंभीर जखमी, प्राप्त माहितीनुसार जलद प्रतिसाद पथकतील रोड उपनी चा कामासाठी गट्टा ते एटापल्ली मार्गावर अभियान राबविलेअसता सकाळी आठचा दरम्यान पोलीस शिपाई नामे संतोष सिडाम याने पार्टी कमांडर नामे शिवदास करमे यांच्यावर गोडी झाडली असता घटनास्थळी असलेल्या रोड वर चालणारे वाहनांच्या साहाय्याने तात्काळ ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर असल्याने तात्काळ पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले.या घंटेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक गडचिरोली अंकित गोयल,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान)सोमय मुंडे,अप्पर पोलीस अधीक्षक(प्राणहिता अहेरी) अनुज तारे यांनी कॉन्स्टेबल संतोष सिडम कडे चौकशी केली असता कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आली,गोडी झाडण्याचा उद्देश अजुन कढले नसून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करती आहे.