चामोर्शी तालुका भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न

चामोर्शी तालुका प्रतिनिधी न्यूज जागर 

दिनांक 1 सप्टेंबर 2022 गडचिरोली जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव होळी यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.

यावेळी मंचावर भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, बंगाली आघाडी अध्यक्ष सुरेश शहा, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक आशीष पीपरे, तालुका महामंत्री विनोद गौरकार, विकास मैत्र, साईनाथ बुरांडे, मुरखळा माल येथील सरपंच तालुका महामंत्री भास्कर बुरे , प्रामुख्यानं उपस्थित होते.

या तालुका कार्यकारिणी बैठकीत प्रामुख्याने विविध गावातील बुथप्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विचार व्यक्त केले आता लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार असून त्यासाठी प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तयार असणे आवश्यक आहे या निवडणुकीच्या पूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती स्थानिकांना देऊन त्याचा त्यांना कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी कार्यकर्त्यांनी कार्य करावे असा बैठकीचा सुर होता

भाजपा जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार यांनी बूथ सशक्तीकरण अभियानांतर्गत ज्या बुथांची कामे अजुनपर्यंत झालेली नाही त्या बूथांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले तालुका कार्यकारिणी बैठक आधी भाजपा ओबीसी आघाडी नेते सरपंच भास्कर बुरे यांचा वाढदिवस असल्याने भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा केला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजपा तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले