अंकिसा प्रतिनिधि, न्यूज जागर
सिरोंचा तालुक्यातील चिंता रेवला या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे.व याच मार्गावरील पुलीयाला मोठा भगदाड पडला आहे चिंता रेवला परिसरातील शेकडो नागरिक याच मार्गाने सिरोंचा तालुका मुख्यालयी ये-जा करतात. व अंकीसा, असारॅअली बँक ला किंवा मेडिकल ला व बाजार पेटेसाठी येणं जाणं करत राहतात,मात्र वर्दळीच्या असलेल्या या मार्गाची पूर्णत: वाट लागल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
चिंता रेवला परिसर व आजूबाजूच्या गावातील अनेक लोक कुठ तहसील कार्यालय, बँक, शैक्षणिक येत असतात तसेच आरोग्य सेवेच्या कामासाठी आणि विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी अंकिसला आणि तहसील कार्यालयाचा कामा साठी सिरोंचा तालुका मुख्यालय जात असतात. गावखेड्यातील नागरिकांचा कुठल्या कोणत्याही कामामुळे संपर्क येत असतो. अंकिसा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे अंकिसा ला जाण्यासाठी अजून एक रस्ता पण आहे, पण त्या मार्गा च्या रोड चा पण तेच आवस्था आहे, पुल वरून पाणी वाहून गेल्याने पुला वर मोठ्ठा खड्डा पडलेले आहे,
गावागावाला जोडणारे रस्ते पक्या स्वरूपाचे झाल्याशिवाय या भागाचा विकास शक्य नाही. चिंता रेवला येथून सिरोंचाला, अंकिसा जाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. खड्डयात पाणी साचून राहत असल्यामुळे खड्डयाचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता वाढली आहे
मागील दिवसापासुन या परिसरत संततधार पाऊस होत असल्यामुळे. चिंता रेवला या गावा जवळील असलेल्या अटोवागू नाल्यावरील अर्धा रोड वाहून गेली आहे. त्यामुळे आवागमनास अडचण निर्माण झाली आहे. सदर पुलावरील स्लॅब वाहून गेले आणि आर्धा रोड चा दुर व्यवस्था झाली आहे, या पुलाचे बांधकाम आणि रोड चा काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे स्पष्ट होत आहे. याकडे लोकप्रतिनिधिनी लक्ष देउन हा मार्ग सुरळीत करण्यात यावा अशी मागणी परीसरातील नागरीकांकडुन होत आहे.



