श्री.अरुण बारसागडे , जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर
एकता जय सेवा बहुउद्देशीय संस्था चांदागड (घुग्घूस), क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा संस्था नकोडा आणि आदिवासी समाज बांधवा मार्फत राजा रावण यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन प्रथा बंद करावी अशी मागणी गोंड आदिवासी समाज बांधवांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने,घुग्घूस पोलीस स्टेशनचे ठाणेदार बबन पुसाटे, घुग्घूस नगर परिषदचे मुख्याधिकारी व नकोडा ग्रामपंचायत यांना निवेदनातून केली आहे.
आदिवासी गोंड समुदाय हा राजा रावणाला आपले पूर्वज,कुलदैवत माणतात.न्यायप्रिय, विवेकवादी, राजनीतिक तज्ञ, दूरदृष्टीकोन असलेला, विवेकवादी,चार्य शिस्तप्रिय व न्यायप्रिय महात्मा राजा रावणला मानतात.
आदिवासीं समाजामध्ये राजा रावणाची पूजा करतात गोंड संस्कृतीचे प्रेरणास्थान, रावणाचा पुतळा तयार करून दहन करण्याची कृरता असून ही हिंसक बाबींना प्रोत्साहन देतात , आदिवासी समाजाचे मन दुखावल्या जात आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये.
राजा रावण यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे दहन म्हणजे अनुसूचित जमातीचा अपमान समजण्यात येईल.यामुळे आदिवासी समाज बांधवाच्या भावना दुखावण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.याकरिता दोन्ही संस्थेचे अध्यक्ष व सदस्य सगा समाज बांधवाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी अध्यक्ष तिरू, गणेश किंनाके, देविदास किवे,मंदेश्वर पेंदोर, कवडू मडावी, विठल कुमरे , दीपक पेंदोर, कुणाल टेकाम, राकेश तिरणकर, विकास मेश्राम,अर्जुन परचाके, नितीन कन्नाके,पराग पेंदोर, हरिश चांदेकर, केशव भाऊ टेकाम, विजय आत्राम,सतीश आत्राम, सुभाष तुमराम,नंदू नैताम,संदीप तोडासे, अजय उईके, बंटी जुमनाके, अरविंद कीवे, विठ्ठल कुमरे, मनीष आत्राम, मनोज चांदेकर, तसेच आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.