गोंडपिपरी तालुक्यातील मोठ्या गावचे व्हिडीओ ड्यूटीच्या वेळातच झाले ‘तुल्ल’,बारमध्ये पँटातच सोडली धार !

श्री.अरुण बारसागडे, जिल्हा प्रतिनिधी , न्यूज जागर 

गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत चंद्रपूर-अहेरी या राष्ट्रीय महामार्गावर सर्वात मोठे गाव असलेल्या तालुक्यातील एका ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या पदाला काळीमा फासणारे कृत्य त्यांच्याकडून घडले आहे.त्यांनी आज (दि.२०) ग्रा.प.कार्यालयात पाय न ठेवता दिवसभर गोंडपिपरीतच तळ ठोकून राहिले.पंचायत समिती कार्यालय परिसरात दुपारपर्यंत थांबून साधारणता चार वाजेपर्यंत शहरातील एका बारमध्ये बराच वेळ त्यांनी घालविला.एव्हाना गावातील आपल्या एका ग्रा.प.सदस्यांसह तेथील ठेकेदारांसोबत त्यांनी मनसोक्त दारू ढोसली.यावेळी पॅन्टातच त्यांनी शरीरातील नैसर्गिक धार सोडली की काय शरीराच्या मध्यवर्ती भागापासून या अधिकाऱ्याचा पॅन्ट सुध्दा ओला दिसून आला.अतिमद्य पिवून राहिल्यामुळे त्यांना धळ चालताही येत नव्हते.त्याचवेळी सोबतच्या ठेकेदारांनी या अधिकाऱ्याला त्याच्या दुचाकी वाहनाने सुरक्षित स्थळी पोहोचविले.त्यांच्या या कलंकित प्रकाराची चर्चा जनतेत सुरू आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील या ग्रामपंचायतीवर गावच्या एका मोठ्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद लाभला आहे.ग्रामपंचायतीवर राजकीय पक्षाची एकहाती सत्ता असून सुध्दा तिथे परस्पर दोन गटाचे वर्चस्व आहे. नेत्याच्या प्रयत्नातून या गावात सध्या ८० लाख रुपयांची विकासकामे सुरू आहेत.या नेत्याच्या बंधूचे येथील कार्यभारावर विशेष लक्ष आहे.अशावेळी सदस्यांच्या दोन गटात ही ग्रामपंचायत विभागली असताना येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांचे मात्र दोन्हीकडून ‘बल्लेबल्ले’ सुरू आहे. सदस्यच ठेकेदार बनलेल्या या ग्रामपंचायतीच्या सचिवाला प्रशासकीय कामकाजासंदर्भात शासनाने अनेक अधिकार बहाल केले.परंतू हे अधिकारी कर्तव्य विसरून त्यांच्या अधिकारांचा मात्र पुरेपूर वापर करीत असताना दिसत आहेत.याच पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या आणि नवीन प्रस्तावित कामासाठी ग्रा.पं.सदस्य व ठेकेदारांकडून ग्रामविकास अधिकाऱ्याची मर्जी राखल्या जात आहे.त्यांना खुश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून आज कर्तव्यावर असताना दिवसभर ग्रामपंचायत कार्यालयाला बुटी मारून ते पंचायत समिती कार्यालय परिसरात भटकताना दिसले.भटकंती थांबताच दुपारनंतर त्यांनी गावातील एका ठेकेदाराच्या दुचाकीवर बसून शहरातील एका बारची वाट पकडली.तिथे ग्रा.पं.सदस्य आणि ठेकेदारासोबत सुमारे तासभर त्यांनी मनसोक्त दारू ढोसली.अगदी बारच्या प्रवेशद्वारावरच ही पार्टी आसनस्थ झाली.सायंकाळी चार वाजतानंतर त्यांची महफिल विसर्जित होऊन या तोल ढासळलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना एका ठेकेदाराने आपल्याच दुचाकीवर बसवून सुरक्षित ठिकाणी हलविले.शरीराच्या मध्य भागापासून पायापर्यंत त्यांचा पॅन्ट ओला दिसून आला.त्यामुळे या महोदयांनी नशेच्या धुंदीत पँटावरच नैसर्गिक क्रिया केली की काय हा प्रश्न त्यावेळी अनेकांच्या तोंडून चर्चिल्या गेला.ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना डोळ्यात धुळ फेकून हा अधिकारी चक्क ड्युटीच्या वेळातच बारमध्ये बसून ग्रा.पं.सदस्य व ठेकेदाराकडून स्वतःची खातिरदारी करून घेत असल्यास जनतेनी आता न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी,हा प्रश्नच आहे.