चामोर्शी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
सार्वजनिक बांधकाम प्रयत्नांना यश
चामोर्शी:- तालुक्यातील घोट हे गाव सर्वात मोठा गाव म्हणून ओळख असून या परिसरात लहान मोठे बऱ्येच गावे आहेत त्या गावांना जाण्यासाठी चामोर्शी ते घोट व मुलचरा रस्त्याचा वापर होतो मात्र हा रस्ता गेल्या काही वर्षांत खड्डेमय झाला असून त्या रस्त्याने वाहन धारकांना वाहन जीव मुठीत घेऊन चालवावे लागते त्यासाठी या रस्त्याची नव्याने बांधणी करावी म्हणून शासनाकडे मागणी केली जात होती त्याची दखल घेत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने शासनाकडे सतत पाठपुरावा केल्याने शासनाने जुलै २०२२ च्या अर्थसंकल्पात चंमोरशी ते घोट रस्त्यासाठी ०५ कोटी व घोट ते मुलचरा रस्त्यासाठी ०५ कोटीची तरतूद करत मान्यता दिल्याने अखेर हे रस्ते नव्याने तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला
चामोर्शी – घोट हा १८ की. मी अंतर असलेल्या मार्गावर अनेक गावे येतात तर या मार्गाने रेगडी, मुलचरा आदी गावांना जाता येतो त्यासाठी या मार्गावर फार मोठी वाहनांची वर्दळ असते मात्र गेल्या काही वर्षांत या रस्त्याची दुरवस्था होत रस्ता खड्डेमय झालाअनेकदा रस्ता नव्याने तयार करण्यात यावा म्हणून सतत मागणी केली जात होती मात्र या कडे लक्ष दिले नाही त्यासाठी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता बड्डे व त्याच्या सहकाऱ्यांनी सतत पाठपुरावा केल्याने शासनाने दखल घेत जुलै २०२२ अर्थसंकल्पात चामोर्शी ते घोट या ०८ की.मी. रस्त्यासाठी ०५ कोटीची तर घोट ते मुलचरा या १६ की.मी रस्त्यासाठी ०५ कोटी ची तरतूद करत मान्यता दिल्याने अखेर या रस्ता नव्याने तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला असून
हे मंजूर रस्त्याची कामे निविदास्तरावर असल्यामुळे नागरिक व वाहन धारकाना मोठा दिलासा मिळणार आहे.