गडचिरोली, ता. २४ : दारू पिण्यावरून झालेल्या वादात मित्राने मित्राचाच लोखंडी रॉडने खून केला. विशेष म्हणजे गडचिरोली शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात या खुनाचा छडा लावला. रोशन ठाकुर, अमोल नारायण दडमल, निलेश मारकवार, अशी आरोपींची नावे असून कुमुद लाटकर असे मृताचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे रविवार (ता. १८) गोकुनलगर येथून अमोल न)नारायण दडमल हा दारू पिऊन चनकाइनगरकडे घरी जात असताना माऊली मंदिर गडचिरोली समोर रोशन ठाकुर व निलेश मारकवार हे मंदिराच्या चौथऱ्यावर बसुन बोलत असताना अमोल दडमल हा त्यांच्या जवळ गेला. हे तिघे मिळून तलावाकडे जात असताना थोडयाच वेळात कुमुद लाटकर हा पाण्याची बॉटल व डिस्पोजल प्लास्टीकचे ग्लास घेऊन गाव तलावावर आला. चौघेही मिळुन निलेश मारकवार यांनी आणलेली चार टिल्लु देशी दारू प्याले. त्यानंतर रोशन ठाकुर व कुमुद लाटकर असे पुन्हा गोकुलनगरकडे तलावाच्या पाळीने दारू आणण्याकरीता गेले. तेव्हा अमोल दडमल व निलेश मारकवार हे तलावाच्या पायऱ्यांवर बसुन होते. १५ मिनिटानी कुमोद लाटकर व अमोल ठाकुर हे दोघे दारूच्या बॉटल्स घेऊन तलावाच्या पाय-या जवळ आले असता रोशन ठाकुर लोखंडाची रॉड तलावाच्या पायरीवर फेकताना दिसला. रोशन ठाकुर हा पूर्वीपासुन चोरीच्या सवयीचा असल्याने त्याने काहीतरी लोखंडाची वस्तु चोरुन आणली असावी, असे त्यांना वाटले. नंतर कुमोद लाटकर याने सगळ्यांना एक -एक दारूचा टिल्लु दिला व स्वतः एक टिल्लु प्याला. त्यानंतर रोशन ठाकुर स्वतःच्या खिशातुन एक देशी दारूचा टिल्लू काढून प्यायला लागला असता कुमोद लाटकर त्याच्या हातातील दारूचा टिल्लू घ्यायला गेला. तेव्हा रोशन ठाकुरने कुमोद लाटकरला दारू दिली नाही. दारू हिसकताना हातातील दारु खाली सांडली तेव्हा कुमोद लाटकर व रोशन ठाकुर यांची झटापट झाली. कुमोद लाटकरने रोशन ठाकुरची कॉलर पकडून “तुम्ही माझ्या पैशानी दारू पिता व मलाच दारू देत नाही.” म्हणत भांडायला लागला.त्यामुळे रोशन ठाकूरने लोखंडी रॉड डोक्यात मारून ठार केले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. मुख्य आरोपीकडुन अधिक तपास चालू आहे. रोशन ठाकुर, अमोल दडमल यां दोघानांही अटक करून न्यायालयासमक्ष हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मंजुर केला असुन त्याच्याकडुन आणखी कोणी साथीदार आहेत किंवा कसे याचा तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत. अवघ्या 12 तासात गडचिरोली पोलीसानी आरोपीना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक पुनम गोरे, पोलिस उपनिरीक्षक संघमित्रा बांबोडे, स्नेहल चौहान, धनंजय चौधरी, स्वप्नील कुडावले, सचिन आडे, परशुराम हलामी, सुजाता टोंबरे यांनी केली.